agriculture news in Marathi, agrowon, Suspicious items are omitted from group farming subsidy | Agrowon

गटशेतीच्या अनुदानातून संशयास्पद बाबी वगळल्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

पुणे  : गटशेतीसाठी राज्य शासनाकडून एक कोटीचे अनुदान दिले जात असल्याचे पाहून राज्याच्या काही भागातून संशयास्पद प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले. यामुळे अनुदानातून पशुधन, कार्यालय बांधकामे वगळण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

पुणे  : गटशेतीसाठी राज्य शासनाकडून एक कोटीचे अनुदान दिले जात असल्याचे पाहून राज्याच्या काही भागातून संशयास्पद प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले. यामुळे अनुदानातून पशुधन, कार्यालय बांधकामे वगळण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. 

राज्यात गटशेतीच्या चळवळीला वेग देण्यासाठी २०१७ ते २०१९ या कालावधीत शेतकऱ्यांचे २०० गट तयार करण्याची घोषणा गटशेतीच्या नव्या धोरणात करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात १०० एकरचे क्षेत्र असलेले किमान पाच ते सहा गट तयार करून एका गटाला कमाल एक कोटी रुपयाचे अनुदान देण्याची तरतूद या धोरणात आहे. या धोरणावर निश्चित काम न झाल्यामुळे शेतकरी गटांसाठी सरकारने पाठविलेले २८ कोटी रुपये खर्च न करता शासनाकडे परत गेले आहेत. 

या योजनेसाठी गेल्या वर्षात ४५ कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. गटाकडून सादर करण्यात आलेल्या प्रकल्प खर्चाच्या ७५ टक्क्यांपर्यंत आणि उर्वरित २५ टक्के निधी वैयक्तिक कामांवर असा प्रत्येक गटावर जास्तीत जास्त एक कोटी रुपये खर्च करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. मुळात गटशेतीची योजना राबविण्यासाठी कृषी विभागात जबाबदार मनुष्यबळ निश्चित केले गेले नाही.

कोणत्याही कक्षाने याबाबत पुढाकार न घेतल्यामुळे तालुका पातळीवर कृषी अधिकाऱ्यांनी तसेच शेतकरी गटांनीदेखील आपआपल्या पद्धतीने अर्थ लावून अनुदानाचे प्रस्ताव तयार केले. 

“राज्य शासनाकडून एक कोटी रुपये मिळणार असल्याचे पाहून काही जिल्ह्यांमधून संशयास्पद प्रस्ताव देखील आले. यात दुभत्या गायींची खरेदी, शेळ्या, कोंबड्यांची खरेदी, कार्यालयीन खर्च-फर्निचर-बांधकामांचा देखील उल्लेख प्रकल्पांमध्ये करण्यात आला. यामुळे गटशेतीची संकल्पना रुजण्याऐवजी शासकीय अनुदानाची उधळपट्टी होण्याची शक्यता तयार झाली होती. यामुळे संशयास्पद बाबी आता या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्यातील शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांना पशुधनाची खरेदी किंवा बांधकामे करण्यासाठी अनुदान मागू नये. त्यासाठी स्वनिधीचा वापर करावा, असे आदेश शासनाने काढले आहेत. “गटशेती करताना पशुधन उदा. शेळ्या, कोंबड्या, म्हशी, गायी यांची खरेदी, कार्यालय भाडे, स्टेशनरी, कार्यालयीन खर्च, फर्निचर, बांधकाम, संगणक खरेदी, प्रयोगशाळेची सामुग्री, मालवाहतुकीची वाहन खरेदी आदी बाबी अनुदानातून वगळण्यात आलेल्या आहेत, असेही शासनाने म्हटले आहे. 

शेततळे, शेड, इलेक्ट्रिक मोटारला अनुदान मिळणार  
गटशेतीसाठी यंत्राकरिता शेडचे बांधकाम, सर्व प्रकारचे संयत्र किंवा मशीनरी, अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी जाळ्या व शेडचे बांधकाम, सामूहिक विहीर व पाइपलाइन यासाठी मात्र अनुदान मिळणार आहे. सामूहिक सिंचनासाठी इलेक्ट्रिक मोटार विकत घेणे, एक कोटी लिटरपेक्षा जास्त साठवण क्षमता असलेले सामुदायिक शेततळे खोदणे तसेच गाय, म्हैस, शेळ्यांसाठी सामुदायिक गोठ्याच्या बांधकामासाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...