नगर ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी खेड्यांचे शोषण करत आहे.
ताज्या घडामोडी
सांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा चिंचेचे दर एक हजार ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. यंदाच्या हंगामात राज्यातील चिंचेचे उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
सांगली : चवीने आंबट असणारी चिंच यंदा गोड झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा चिंचेचे दर एक हजार ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत. यंदाच्या हंगामात राज्यातील चिंचेचे उत्पादन सुमारे २० टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.
राज्यात मुळात चिंचेची लागवड बांधावर मोठ्या प्रमाणात आहे. हे पीक केवळ पावसावर अवलंबून असते. यंदा परतीचा पाऊस चांगला झाल्याने पीक बहरले. सध्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चिंचा काढणीचे काम सुरू झाले आहे. तासगाव येथील बाजार समितीत चिंचेचे सौदेदेखील सुरू झाले आहे. तासगाव बाजार समितीत चिंचेला १० हजार २२५ ते ११ हजार ५०० रुपये, तर सरासरी १० हजार ७२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय.
शासनाकडून व सामाजिक वनीकरण विभागाकडून चिंचेची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली दिसते आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून चिंचेकडे पाहिले जाते आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपासून अनेक शेतकरी चिंचेची लागवडही करण्यासाठी पुढे आले आहे. गतवर्षी जुलै ते सप्टेंबरपर्यंत पावसाने समाधानकारक हजेरी लागवली. जून ते जुलै महिन्यातच चिंचेला फुलोरा येतो. त्यानंतर चिंचा लागून मार्चपर्यंत त्याची वाढ होते.
याच दरम्यान, परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे चिंचेच्या वाढीच्या काळात पाऊस झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा झाडाला चिंचा मोठ्या प्रमाणात लगडल्या आहेत. यंदाच्या हंगामात बांधावरच चिंचांना ९० ते १०० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतोय. तर बाजार समितीत सरासरी १०७२५ रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळतोय. यामुळे यंदा आंबट असलेली चिंच उत्पादनांना गोडी देणार आहे.
यंदा पाऊस पाणी चांगला असल्याने चिंचेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चिंचेच्या हंगामात चिंचेला प्रतिक्विंटलला एक हजार ते दीड हजारांनी दर अधिक आहेत.
- कुमार शेटे,व्यापारी, तासगाव बाजार समिती, तासगाव
माझ्या शेताच्या बांधावर चिंचेची लागवड आहे. तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे चिंचेच्या झाडाला बहार चांगला आला आहे. यामुळे गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाली आहे.
- कामाण्णा पाटील,चिंच उत्पादक शेतकरी, जालिहाळ खुर्द, ता. जत
- 1 of 349
- ››