agriculture news in Marathi, agrowon, Ten thousand applications for JCB, Poklen | Agrowon

जेसीबी, पाेकलेनसाठी दहा हजार अर्ज
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

पुणे : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जल व मृद संधारणाच्या कामांसाठी जेसीबी आणि पाेकलेन (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य याेजनेत राज्यभरातून सुमारे १० हजार अर्ज दाखल झाले असून, यामधून केवळ एक हजार लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. एक हजार लाभार्थी निवडीसाठी १० हजार अर्ज दाखल झाल्याने लाभार्थी निवडीसाठी सरकारची कसरत हाेणार आहे. सर्वाधिक ८७० अर्ज नगर, तर सर्वांत कमी ३ अर्ज मुंबईतून दाखल झाले आहेत.  

पुणे : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जल व मृद संधारणाच्या कामांसाठी जेसीबी आणि पाेकलेन (अर्थमूव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य याेजनेत राज्यभरातून सुमारे १० हजार अर्ज दाखल झाले असून, यामधून केवळ एक हजार लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. एक हजार लाभार्थी निवडीसाठी १० हजार अर्ज दाखल झाल्याने लाभार्थी निवडीसाठी सरकारची कसरत हाेणार आहे. सर्वाधिक ८७० अर्ज नगर, तर सर्वांत कमी ३ अर्ज मुंबईतून दाखल झाले आहेत.  

सुशिक्षित बेराेजगार तरुण, बेराेजगारांची सहकारी संस्था, नाेंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, विविध कार्यकारी साेसायट्यांना ही याेजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये १७ लाख ६० हजार रुपयांची कमाल मर्यादा ठेवण्यात अाली असून, या याेजनेसाठी शासन पाच वर्षांचे व्याज भरणार असून, त्याची कमाल मर्यादा ५ लाख ९० हजार रुपये एवढी असणार आहेत. 
पात्र लाभार्थ्यास वित्तीय संस्थांकडून कर्ज देण्यात येणार असून, याची कमाल मर्यादा १७ लाख ६० हजार रुपये असणार असून, शासनाच्या वतीने सरळ व्याज पद्धतीने १२ टक्के दराने व्याज पाच वर्षे देण्यात येणार आहे. 

दरम्यान याेजनेची मुदत संपल्यानंतर झाेपतून जागे झालेल्या लाेकप्रतिनिधींनी आपल्या बगलबच्च्यांना या याेजनेत घुसविण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांनी पहिल्या टप्प्यातील लाभार्थी निवड पारदर्शी व्हावी, पुढील टप्प्यात बघू असे सांगत. मार्चअखेर जिल्हा पातळीवर जेसीबी पाेकलेन वाटपाचे कार्यक्रम घेण्याचे आदेश संबधित विभागाला दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लाभार्थी निवडीसाठी अटी व नियम जारी
जलसमृद्धी (अर्थमूव्हर्स) यंत्रसामुग्री व्याज अर्थसाह्य सवलत याेजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या १ हजार जेसीबी पाेकलेनेसाठी सुमारे १० हजार अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड पारदर्शी व्हावी, यासाठी शासनाने अटी व नियम जारी केले आहेत. यामध्ये लाभार्थ्याने विनाअट कर्ज मंजुरीचे पत्र आॅनलाईन प्रणालीमध्ये २३ मार्चपर्यंत अपलाेट करण्याची प्रमुख अट टाकण्यात आली आहे. या अटीमध्ये देखील एक हजारपेक्षा जास्त लाभार्थी पात्र झाल्यानंतर साेडत काढण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

 

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...