agriculture news in Marathi, agrowon, There is no need of license acquire for the land | Agrowon

जमिनीचा अकृषिक परवाना घेण्याची आवश्यकता नाही
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे : जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्यातील अडचणी दूर करणे आणि कार्यप्रणालीमध्ये सुलभता आणण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अधिनियमामध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार विकास आराखड्याप्रमाणे मान्यताप्राप्त असलेला वापर करण्यासाठी आता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. केवळ अकृषिक आकारणी करून बांधकाम परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची समान कार्यपद्धती पुणे विभागात लागू व्हावी यासाठीचे परिपत्रक विभागीय स्तरावर पारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.

पुणे : जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आवश्यक परवानग्यातील अडचणी दूर करणे आणि कार्यप्रणालीमध्ये सुलभता आणण्यासाठी शासनाने महाराष्ट्र अधिनियमामध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार विकास आराखड्याप्रमाणे मान्यताप्राप्त असलेला वापर करण्यासाठी आता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. केवळ अकृषिक आकारणी करून बांधकाम परवानगी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची समान कार्यपद्धती पुणे विभागात लागू व्हावी यासाठीचे परिपत्रक विभागीय स्तरावर पारित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.
श्री. दळवी म्हणाले, की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामधील कलम ४२ नंतर एकूण चार सुधारित कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार कलम ४२ ‘अ’नुसार विकास योजनेतील समाविष्ट क्षेत्रातील जमीन वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.

कलम ४२ ‘ब’नुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट जमीन वापरातील तरतुद बघून अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीसाठी जमीन वापरात बदल करण्यासाठी योजना प्रसिद्ध केल्यावर यामधील क्षेत्रासाठी रूपांतरणकर, अकृषिक आकारणी आणि लागू असेल त्या ठिकाणी नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी यांचा भरणा केला असेल तर अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीचा वापर हा विकास योजनेत दर्शविलेल्या वापरात रूपांतरित करण्यात आल्याचे मानण्यात येईल. 

कलम ४२ ‘अ’ आणि ४२ ‘ब’च्या तरतुदी लागू होत असलेल्या क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्यास संबंधित नियोजन प्राधिकरण सक्षम आहे. तसेच कलम ४२ ‘क’नुसार प्रादेशिक योजनांमध्ये अंतर्भूत जमिनीकरिता जमीन वापराच्या रूपांतरणासाठी तरतूद व कलम ४२ ‘ड’नुसार निवासी प्रयोजनासाठी जमीन कोणत्याही गावाचे ठिकाणाच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आत स्थित क्षेत्रात किंवा नगर किंवा शहर यांच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात, परंतु प्रारूप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरिता वाटप केलेल्या क्षेत्रात स्थित असलेली कोणतीही जमीन अशा क्षेत्रात लागू असलेल्या विकास नियंत्रणाच्या तरतुदीच्या आधीन राहून, निवासी प्रयोजनासाठी किंवा प्रारुप किंवा अंतिम प्रादेशिक योजनेनुसार मान्यताप्राप्त प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रूपांतरित केल्याचे मानण्यात येईल.

अशा प्रकारे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये सुधारणा केल्यामुळे विकास योजनेत किंवा प्रादेशिक योजनेत समाविष्ट असलेल्या जमिनीकरता स्वतंत्ररीत्या अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. कलम ४२ ‘ड’मधील तरतुदीनुसार रक्कम भरल्याचे चलन किंवा रूपांतरणकर, अकृषिक आकारणी व नजराणा व इतर शासकीय देणी याबाबतचा भरणा केल्याची पावती हीच अकृषिक वापरामध्ये ती जमीन रूपांतरित केल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल आणि त्याबाबतीत आणखी कोणताही पुरावा आवश्यक असणार नाही. रक्कम भरल्यानंतर नियोजन प्राधिकारी यांनी अर्जदारास तात्काळ बांधकाम परवानी द्यावी, असे श्री. दळवी यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...