agriculture news in Marathi, agrowon, Today is the main day of Jotiba Yatra | Agrowon

जोतिबा यात्रेचा आज मुख्य दिवस
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा यात्रेचा आज (शनिवार) मुख्य दिवस आहे. जोतिबाचा डोंगर यात्रेसाठी सज्ज झाला आहे. डोंगरावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.  

कोल्हापूर : वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा यात्रेचा आज (शनिवार) मुख्य दिवस आहे. जोतिबाचा डोंगर यात्रेसाठी सज्ज झाला आहे. डोंगरावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. यात्रा सुरक्षित पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जय्यत तयारी केली आहे.  

यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक सेवा संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी मोफत अन्नछत्राचे आयोजन केले असून, चार दिवस अन्नछत्र सुरू राहणार आहे. कामदा एकादशीच्या मुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने चैत्र यात्रेला मंगळवारपासून (ता.२७) पासून सुरवात झाली. रविवारची (ता.१) पाकळणी झाल्यानंतर यात्रेची सांगता होईल. देशभरातून भाविक दाखल होत आहेत. विविध ठिकाणांहून मानाच्या सासनकाट्या दाखल झाल्या आहेत. दुपारी विविध मंत्र्यांच्या हस्ते पूजन होईल. सायंकाळी सासनकाट्यांची मिरवणूक निघेल.

जिल्हा पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तासाठी १८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर बसवले आहेत. आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक प्रवासी वाहतूक, व्हाइट आर्मीचे रेस्क्यू पथक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि जिल्हा प्रशासनाने यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यात्रा काळात येणाऱ्या भाविकांसाठी सहजसेवा ट्रस्ट, आर. के. मेहता ट्रस्ट आणि शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीने मोफत अन्नछत्राचे आयोजन केले आहे. मंदिरात प्रवेश करणाऱ्या सासनकाठ्यामुळे गर्दी होत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी मानाच्या सासनकाठ्यांना दक्षिणद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...