agriculture news in Marathi, agrowon, Today's meeting of shareholders of Agri Weather Advisory Services | Agrowon

कृषी हवामान सल्ला सेवा देणाऱ्या भागधारकांची आज बैठक
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे :  कृषी-हवामान सल्ला सेवा पुरविणाऱ्या सर्व भागधारकांची राज्यस्तरीय बैठक पुणे कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृह येथे बुधवारी (ता. १४) आयोजित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणे :  कृषी-हवामान सल्ला सेवा पुरविणाऱ्या सर्व भागधारकांची राज्यस्तरीय बैठक पुणे कृषी महाविद्यालयातील शिरनामे सभागृह येथे बुधवारी (ता. १४) आयोजित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ग्रामीण कृषी मौसम सेवांकरिता कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व भारतीय हवामानशास्त्र विभाग हवामान महितीच्या आधारे पीक उत्पादन, तसेच किडी व रोगांच्या प्रादुर्भाव व प्रसाराबाबतचे अंदाज प्रसारित करीत असतात. हे अंदाज आकाशवाणी वरील “माझं घर, माझं शेत” कार्यक्रमातील कृषी सल्ला या भागातून प्रसारित केले जातात.

महत्त्वपूर्ण कृषी हवामान विषयक अंदाज वर्तवून सल्ला सेवा देताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्यांचे निराकरण करणे, सल्ला सेवेची प्रसार गुणवत्ता सुधारणे आणि बदलत्या हवामानानुसार शेतीपद्धतीत करावयाचे बदल याबाबत सर्व संलग्न भागधारकांना मार्गदर्शन करणे अशा, उद्देशांनी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व कृषी विभागाचा इतर अधिकारी वर्ग, सर्व कृषी विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक, कृषी-हवामान क्षेत्रीय एकाकांचे नोडल व तांत्रिक अधिकारी, विद्यापीठाच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), पुणेचे सर्व अधिकारी आणि शेतकरी सहभागी होणार आहेत.

बैठकीदरम्यान कृषी हवामान सल्ल्याकरिता हवामान अंदाज वर्तविणे, या विषयानुरूप महाराष्ट्रातील संधी व आव्हाने, कृषी हवामान सल्ल्याच्या प्रसार व बळकटीकरणामध्ये कृषी विभागाची भूमिका, पीकनिहाय विशिष्ट हवामान सल्ला, पशुपालन व मत्स्योत्पादानाकरिता विशिष्ट हवामान सल्ला या बाबींवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे. याशिवाय गुणवत्तापूर्ण कृषी-हवामान सल्ल्यांची निर्मिती, प्रसार, प्रसिद्धी व प्रत्याभरण याविषयी चर्चा होणार आहे. 

कार्यक्रमाकरिता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. के. पी. विश्वनाथा, राज्याचे कृषी आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
पावसाच्या आगमनानुसार पीक नियोजनपावसाने ओढ दिल्याने पेरणीचे नियोजन चुकते. उपलब्ध...
ज्वारी उत्पादनवाढीची प्रमुख सूत्रेज्वारीची पेरणी जूनचा दुसरा आठवडा ते जुलैच्या...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
राज्यात तूर खरेदी पुन्हा सुरू होण्याची...नवी दिल्ली : राज्यात १५ मे पासून बंद झालेली तूर...
पीकविम्याचे निकष बदला; सांगलीत आज...सांगली : अवकाळी पाऊस आणि गारपीट पावसाने द्राक्ष...
भाजपमध्ये येण्यासाठी रांग; निरंजन यांचे...मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश...
कृषिपंपांना भारनियमनाची समस्याजळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा...
शेतीच्या प्रश्‍नांबाबत...जळगाव : कर्जमाफीचा घोळ, पीककर्ज वितरणाची...
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती....
सेंद्रिय शेती, वाणबदल, यांत्रिकीकरणाचा...आनंद पाटील अनेक वर्षे रासायनिक शेती करीत होते....
तंत्रज्ञानाच्या नियोजनबद्ध वापराने...कैलास, विलास, ईश्वर व किशोर ही निर्मळ कुटुंबातील...
पाण्याचा नियंत्रित वापर, जमिनीच्या...कठोरा (ता. जि. जळगाव) येथील अल्पभूधारक शेतकरी...
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदलअकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी...
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...