टोमॅटोवर करप्याचे संकट
ज्ञानेश उगले
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

टोमॅटोची बांधणी सुरू आहे. मागे झालेला पाऊस आणि आता रोज पडणारे दव यामुळे करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. या स्थितीत पीक संरक्षणाचा खर्च वाढला आहे.
-प्रकाश काकड, मखमलाबाद, ता. जि. नाशिक

नाशिक : खरीप हंगामातील टोमॅटो लागवड करपा आणि मररोगाच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडली आहे. पाऊस उघडल्यानंतर अचानक तापमान वाढल्याने टोमॅटोची पाने, खोड, मुळे यावर डाग, ठिपके तसेच बुरशी आढळून आली.

यामुळे टोमॅटो उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. वेळेत नियंत्रण न झाल्यास रोगांमुळे उत्पादनात ४० टक्के घट होण्याची भीती आहे.

राज्यात टोमॅटो हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कमी कालावधीचे हे पीक राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत घेतले जाते. नाशिक व नगर आणि पुणे भागातील हंगाम महत्त्वाचे मानले जातात. कमी पावसाच्या भागात ही खरीप टोमॅटोचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जाते.

नोटाबंदीमुळे मागील वर्षीच्या हंगामात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दणका बसला होता. यंदा सुरवातीपासून पावसाने चांगली साथ दिल्याने यंदाही मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड झाली आहे. ऑगस्ट, सप्टेंबर या दोन महिन्यात पावसाने बहुतांश भागातील टोमॅटोला झोडपले आहे.

मागील तीन दिवसांपासून अचानक पाऊस थांबून तापमानात वाढ झाली आहे. याच काळात पिकात सुप्तावस्थेत असलेल्या बुरशीजन्य, जीवणूजन्य रोगांनी डोके वर काढले आहे. हे आक्रमण अचानक दिसून आल्याने टोमॅटो उत्पादक चक्रावले आहेत.

नाशिक विभागात टोमॅटोत बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य मर रोग, बुरशीजन्य करपा या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढला आहे. परिपक्व झालेल्या टोमॅटोमध्ये तसेच काढणीयोग्य फळांमध्येही रंग विकसित न होण्याची विकृती दिसून येत आहे.

शेतकरी नामदेव भामरे (पिंगळवाडे, ता. सटाणा, जि. नाशिक) म्हणाले, की कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या भागात टोमॅटोवर करपा, भुरी, अर्ली ब्लाईटचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची स्थिती आहे.

याबाबत के. के. वाघ कृषी महाविद्यालयातील कीटकशास्त्र विषयातील तज्ज्ञ तुषार उगले म्हणाले की, नाशिक भागात मागील महिन्यात झालेला अतिपाऊस, अनेक दिवस शेतात साचून राहिलेले पाणी, सकाळी पडणारे दव, त्यानंतर वाढत राहणारे तापमान ही स्थिती बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांना पूरक अशी निर्माण झाली आहे.

टोमॅटो उत्पादकांनी सल्ला घेऊन बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा. जीवाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी प्रतिजैविकांची फवारणी करावी. मुळकूज नियंत्रणासाठी मुळाच्या कार्यकक्षेत ट्रायकोडर्मासारख्या जैविक घटकांचा वापर करावा.

 

इतर अॅग्रो विशेष
बलिप्रतिपदेला शेतकऱ्यांचा महामोर्चा :...जळगाव : भाजपातून आउटगोइंग सुरू झाले, त्यांचे...
सहकार विकास महामंडळ विसर्जित करण्याची...पुणे ः सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करून...
कांदा दर अजून सव्वा महिना टिकून राहतील...नाशिक : लासलगाव बाजार समितीत सोमवारी (ता.25)...
मत्स्य़पालन ठरले फायदेशीर आसेगाव (जि. वाशिम) येथील खानझोडे बंधू यांनी...
कर्जमाफी अर्जांची साठ टक्के छाननी झाली...मुंबई ः शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन...
फवारणी यंत्राच्या कल्पक निर्मितीतून वेळ...एकीकडे शेतीत यांत्रिकीकरण वाढत आहे, तर दुसरीकडे...
सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान हवामान :  तीनही हंगामात लागवड शक्‍य...
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी...मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार...
नाशिक जिल्ह्यातील १६ धरणे तुडुंब नाशिक  : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह,...
मूग, उडीद पीककापणीची माहिती २८ पर्यंत...मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यांतील मूग आणि...
गरज पडल्यास अाणखी साखर अायात : केंद्रीय...नवी दिल्ली: देशात जर साखरेची गरज पडल्यास अाणखी...
जळगाव जिल्ह्यात ‘कृषी’ संबंधित ३९९ पदे...जळगाव ः जिल्ह्यात राज्य शासनांतर्गत असलेल्या...
भातावर करपा, तांबेरा, पाने गुंडाळणारी...कोल्हापूर : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू असला...
पूर्व विदर्भात धानावर गादमाशी,...नागपूर ः पूर्व विदर्भात यंदा पावसाअभावी ८० टक्‍के...
भेंडी पिकात कमीत कमी निविष्ठा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
मॉन्सून २८ पासून परतीच्या मार्गावरपुणे : सध्या राजस्थानच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
रब्बी हंगामासाठी सुधारित अवजारेरब्बी हंगामाचा विचार करता मजुरांची उपलब्धता व...
ऊस उत्पादकांच्या खिशाला ३६१ कोटींची...सोलापूर ः राज्य सरकारने आता शेतकऱ्यांकडूनही भाग...
कर्जमाफीतील पाचर ऊस उत्पादकांच्या मुळावरमुंबई : कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे नियमित...
लिंगभेद मानण्याची मनोवृत्ती बदलावीपुणे ः ‘मुलगाच पाहिजे’चा कुटुंबातून होणारा...