agriculture news in Marathi, agrowon, Tractors auctioned stopped by aggressive farmers in Nampur | Agrowon

आक्रमक शेतकऱ्यांनी बंद पाडले ट्रॅक्टर्स लिलाव
प्रशांत बैरागी 
बुधवार, 21 मार्च 2018

नामपूर, जि. नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचे लिलाव शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकरी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाला बॅकफूटवर यावे लागले. शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा अशा प्रकारे बेकायदा लिलाव करण्याचा अधिकार जिल्हा बँकेला दिला कुणी, असा सवाल यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

नामपूर, जि. नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने थकबाकीदार शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर्सचे लिलाव शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी बंद पाडले. शेतकरी नेत्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा बँक प्रशासनाला बॅकफूटवर यावे लागले. शेतकऱ्यांच्या मालमत्तेचा अशा प्रकारे बेकायदा लिलाव करण्याचा अधिकार जिल्हा बँकेला दिला कुणी, असा सवाल यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केला. 

बँकेच्या सक्तीच्या वसुली मोहिमेविरोधात पुढील आठवड्यात जिल्हा बँकेवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्हा बँकेच्या थकित कर्जवसुलीस प्राधान्य दिले आहे. त्यानुसार थकित कर्जपोटी शेतकऱ्यांची वाहने वसुली पथकाच्या माध्यमातून जमा करून त्यांच्या लिलावातून थकित कर्जाची रक्कम वसूल करण्याचे आदेश जिल्हा बँकेच्या प्रशासनाने सर्व शाखांना दिले आहेत.

त्यानुसार नामपूर विभागात शेतकऱ्यांचे ३५ ट्रॅक्टर्स जप्त करण्यात आले होते. त्यापैकी १७ ट्रॅक्टर्सचा लिलाव मंगळवारी (ता. २०) नळकस रस्त्यालगत असणाऱ्या शिवनेरी कॉलनीत घेण्यात येणार होता. परंतु लिलाव सुरू झाल्याची कुणकुण लागताच शेतकरी संघटनेचे नेते खेमराज कोर, तालुकाध्यक्ष भास्कर सोनवणे, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सोनवणे, नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार, समीर सावंत, राजीव सावंत, दगा बच्छाव, रमेश अहिरे आदींनी लिलावात हस्तक्षेप करून लिलाव बंद पाडले. शेतकऱ्यांची वाहने कुणीही विकत घेऊ नये, असे आवाहन लालचंद सोनवणे यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्सचे लिलाव बंद पाडल्यानंतर आगामी काळात जिल्हा बँक प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यावेळी देवळा येथील शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र शेवाळे, प्रगतिशील शेतकरी दिदीपक अहिरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष किरण सावंत, संजय जाधव, रामदास ठाकरे आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते. 

दरम्यान ट्रॅक्टर लिलावात सहभागी होण्यासाठी जिल्हा बँकेकडून प्रत्येकी दहा हजार रुपये शुक्क आकारण्यात आले होते. परंतु लिलाव रद्द झाल्यानंतर सदर रक्कम परत देण्यास दिरंगाई होत असल्याचा राग येऊन एका संतप्त शेतकऱ्याने चक्क दगड हातात घेऊन लिलावास आलेल्या जिल्हा बँकेच्या अधिकारी यांना जाब विचारला. त्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना अनामत रक्क्कम अदा करण्यात आली.

शेतमालाला आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नाही. भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे गेल्या तीन ते चार वर्षापासून शेतीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. शेतकऱ्यांच्या जिवावर गब्बर झालेल्या संचालकांची मालमत्ता आधी जप्त करा. जिल्हा बँकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. 
- खेमराज कोर, शेतकरी संघटनेचे नेते, अम्बासन

जिल्हा बँकेची गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वाहनांची थकबाकी आहे. खातेदार, ठेवीदार यांना रक्कम देताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे सर्व कायदेशीर पद्धतीने लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असल्याने शेतकऱ्यांनी वसुलीकामी सहकार्य करावे. 
- किशोर कदम, मुख्य व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक नाशिक 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...