agriculture news in Marathi, agrowon, Traditional breakdown of late harvesting sugar getting more rate | Agrowon

उशिरा तुटणाऱ्या उसाला जादा दराची परंपरा खंडित
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

कोल्हापूर ः गेल्या काही वर्षात यंदा पहिल्यांदाच साखर हंगामाचा शेवट सुना सुना होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी फेब्रुवारीपासून हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास जादा दराची घोषणा करतात. परंतु यंदा असे कुठेच चित्र दिसले नाही. साखरेला दर नसल्याने कारखान्यांनी हात आखडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

कोल्हापूर ः गेल्या काही वर्षात यंदा पहिल्यांदाच साखर हंगामाचा शेवट सुना सुना होत असल्याचे चित्र आहे. प्रत्येक वर्षी साखर कारखाने जास्तीत जास्त ऊस मिळविण्यासाठी फेब्रुवारीपासून हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास जादा दराची घोषणा करतात. परंतु यंदा असे कुठेच चित्र दिसले नाही. साखरेला दर नसल्याने कारखान्यांनी हात आखडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

अनेक कारखान्यांनी अगदी साधेपणाने गळीत हंगामाची सांगता केली आहे. शिल्लक उसाची तोडणीच आवरत नसल्याने नामवंत कारखान्यांनीही जादा दर देवून ऊस उत्पादकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यंदाच्या हंगामात सोडून दिला आहे. हंगाम संपण्यास बोटावर मोजण्याइतकेच दिवस उरल्याने आता उशिरा गाळप होणाऱ्या उसास जादा दर मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. 

कारखान्यांमध्ये स्पर्धा नाही 
दरवर्षी जिल्ह्यातील मातब्बर कारखान्यांमध्ये ऊस गाळपासाठी स्पर्धा लागते. चांगला दर देण्यासाठी प्रसिद्ध कारखान्यांकडून उशिरा तुटणाऱ्या उसास जादा दर देण्याची घोषणा होत असते. साधारणत: फेब्रुवारी उजाडला की कारखाने जाहीर केलेल्या उसापेक्षा मार्चमध्ये तुटलेल्या उसास टनास शंभर रुपयांच्या आसपास जादा दर देण्याची घोषणा करतात. जेणेकरून शेवटच्या टप्प्यातील ऊस कारखान्याला येऊन शेवटच्या दिवसापर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालावेत, अशी अपेक्षा कारखानदारांची असते. 

यंदा सुरवातीपासूनच मरगळ 
यंदा हंगाम सुरू झाल्यापासूनच कारखान्यांमध्ये फारसा उत्साह नव्हता. साखरेचे दर कमालीचे घसरल्याने त्याचा दबाव कारखानदारांवर होता. यातच राज्य बॅंकेनेही मूल्यांकनात घट केल्याने जाहीर केलेला पहिला हप्ता देण्यासाठीही कारखानदारांना कसरत करावी लागली. हंगामाच्या मध्यावर साखरेचे दर कोसळलेले असताना यंदा पहिल्यांदाच जाहीर केलेल्या दरात पाचशे रुपयांची कपात करण्याची घोषणा करण्याची नामुष्की कारखान्यांवर आली. या चक्रातून कारखाने सावरलेच नाहीत. लाखो रुपयांची देणी कायम ठेवूनच अनेक कारखाने बंद झाल्याची स्थिती आहे. यामुळे उशिराच्या  उसास जादा दर देण्याचा विचारही कोणी केली नाही

निर्णयाला विलंब झाल्याने नाराजी 
केंद्र व राज्य शासनाने हंगाम सुरू असताना अनेक निर्णय जाहीर केले. पण अपवाद वगळता यातून ठोस काहीच निर्माण झाले नसल्याने कारखानदारांतून मोठी नाराजीची भावना दिसून येत आहे. साखरेचे दरच स्थिर राहात नसल्याने साखर विक्रीच्या निविदा काढणे, त्याची विक्री करणे आणि त्यातून बॅंकेचे कर्ज व शेतकऱ्यांचा हप्ता भागविणे या गोष्टी करताना मोठी अडचण निर्माण झाल्याचे एका कारखाना प्रतिनिधीने सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
जळगावात लिंबू २२०० ते ५००० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
यसनी तोडून पुढे या : रमेश घोलपसोलापूर  : "परिस्थितीने बांधलेल्या यसनी तोडत...
पुणे विभागासाठी साडेपाच कोटींवर वृक्ष...पुणे  ः पर्यावरणाचे संतुलन अबाधित...
सोयाबीन उत्पादकांना पीकविम्याची रक्कम...मुंबई  : शासनाच्या विशेषतः कृषी विभागाच्या...
आमदार निधीतून दुष्काळग्रस्त भागासाठी...मुंबई  ः दुष्काळग्रस्त भागातील जनतेला आमदार...
साडेचौदा टन केशर, बदामी आंबा...मुंबई : वातावरण नियंत्रित करून फळाचे...