agriculture news in Marathi, agrowon, two Lakh Quintal Tur Buy in Nanded, Parbhani, Hingolite and 200 | Agrowon

नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वातीन लाख क्विंटल तूर खरेदी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 मे 2018

नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्या़ंत सोमवार (ता. १४)पर्यंत २७ हजार ९६८ शेतकऱ्यांची ३ लाख २२ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदीसाठी अंतिम मुदत आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३४ हजार १४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी आहे.

नांदेड  ः मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्या़ंत सोमवार (ता. १४)पर्यंत २७ हजार ९६८ शेतकऱ्यांची ३ लाख २२ हजार ५२४ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदीसाठी अंतिम मुदत आहे. अजून या तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या ३४ हजार १४४ शेतकऱ्यांची तूर खरेदी बाकी आहे.

खरेदीसाठी आणखीन मुदतवाढ दिली तरी खरेदीची गती अशीच राहिल्यास उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. या जिल्ह्यांमध्ये २ हजार ९४० शेतकऱ्यांचा ४५ हजार ८६६ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. तीन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे तुरीचे ५४ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयांचे, तर हरभऱ्याचे १५ कोटी १७ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे चुकारे अडकले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या ९ आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या १ अशा १० खरेदी केंद्रांवर तुरीसाठी २८ हजार १७० शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी १६ हजार ८९४ शेतकऱ्यांची १ लाख ६९ हजार ६०५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली अजून ११ हजार २७६ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी बाकी आहे. परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या १ अशा ८ केंद्रांवर नोंदणी केलेल्या २० हजार २८२ शेतकऱ्यांपैकी ५ हजार ८१ शेतकऱ्यांची ५ हजार ८१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, अद्याप १५ हजार २०१ शेतकऱ्यांची तूर शिल्लक आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेडच्या ५ खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या १३ हजार ७२६ पैकी ६ हजार ५९ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली असून, अद्याप ७ हजार ६६७ शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी बाकी आहे. साठविण्यासाठी गोदाम नसल्यामुळे १ लाख ६६४ क्विंटल तूर खरेदी केंद्रांवर पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे ५४ कोटी ४८ लाख ६१ हजार रुपयाचे चुकारे रखडले आहेत. 

सध्या अनेक ठिकाणी खरेदी केलेला शेतीमाल साठविण्यासाठी गोदामे नाहीत. अनेक ठिकाणी चाळण्या, वजनकाट्यांची संख्या कमी असून, बारदाना कमी पडत आहे. त्यामुळे खरेदी बंद राहत आहे. मंगळवारी (ता. १५) तूर खरेदी बंद होणार असल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांच्या तुरीचा प्रश्न कायम राहणार आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...