agriculture news in Marathi, agrowon, in Udgir 9 crore rupees outstanding of farmers | Agrowon

उदगीरमध्ये नाफेडकडे नऊ कोटी थकले
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

उदगीर, जि. लातूर ः चालू हंगामात नाफेडतर्फे उदगीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची सुरू असलेली खरेदी गोदामाअभावी बंद करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर फेब्रुवारीपासून तुरीची विक्री केलेल्या १,८६७ शेतकऱ्यांचे ९ कोटी २० लाख ७४ हजार २६२ रुपयांची रक्कम नाफेडकडे थकीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

उदगीर, जि. लातूर ः चालू हंगामात नाफेडतर्फे उदगीर येथे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर शेतकऱ्यांच्या तुरीची सुरू असलेली खरेदी गोदामाअभावी बंद करण्यात आली आहे. खरेदी केंद्रावर फेब्रुवारीपासून तुरीची विक्री केलेल्या १,८६७ शेतकऱ्यांचे ९ कोटी २० लाख ७४ हजार २६२ रुपयांची रक्कम नाफेडकडे थकीत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. 

सोमनाथपूर (ता. उदगीर) भागात फेब्रुवारीत नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी आजपर्यंत ६८०० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यापैकी १९०९ शेतकऱ्यांची या खरेदी केंद्रावर तूर खरेदी करण्यात आलेली आहे. त्यापैकी ता. सात फेब्रुवारीपर्यंतच्या ४२ शेतकऱ्यांची २५२ क्विंटल ३० किलो तूर खरेदीपोटी १३ लाख ७५ हजार ३५ रुपये इतकी रक्कम या ४२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर ऑनलाइन जमा करण्यात आली आहे; तर ता. आठ फेब्रुवारीनंतर तूर विक्री केलेल्या १८६७ शेतकऱ्यांची रक्कम अद्यापही जमा झालेली नाही.

शेतकऱ्यांच्या तुरी नाफेडकडे हमीभाव मिळेल या अपेक्षेने विक्री करूनही अद्यापपर्यंत रक्कम मिळाली नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रावर आजपर्यंत १,९०९ शेतकऱ्यांची १७,४१६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आलेली आहे. अजूनही नोंदणी केलेल्या ४,८९१ शेतकऱ्यांची तूर खरेदी रखडलेली आहे. अशातच खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी नाफेडकडे जागा नसल्याने खरेदी केंद्रावर तूर खरेदी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या केंद्रावरील तुरीचा काटा बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांना परत जावे लागले. तूर साठवणुकीसाठी तत्काळ जागा उपलब्ध करून देऊन तुरीचा काटा चालू करावा. शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करून रक्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागा नसल्याने काटा बंद करण्यात आला आहे. नाफेडने तत्काळ गोदाम उपलब्ध करून देऊन नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या तुरीचा काटा लवकर करून रक्कम अदा करावी. शेतकऱ्यांचे हरभरा हे पीक निघाले असून हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी सतराशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. आणखी दोन हजार शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाइन नोंदणीसाठी आले आहेत. त्यामुळे तूर खरेदी लवकर संपवून हरभरा खरेदी सुरू करणे गरजेचे आहे. 
- भरत चामले, 
अध्यक्ष, तालुका खरेदी-विक्री संघ

इतर ताज्या घडामोडी
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...
गोंदिया जिल्ह्यात गणेशोत्सवाद्वारे शेती...गोंदिया :गणेशोत्सवाच्या माध्यमातून कृषी...
सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीस...सातारा   ः राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध...
सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळ अन हुमणीचे...सोलापूर   ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात...
पीकविमा योजनेतून कंपन्यांचे भले ः विखे...पुणे   ः शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, सोयाबीन, मका,...ऊस हुमणी किडीच्या नियंत्रणासाठी, फिप्रोनील (०.३...
अार्थिक व्यवस्थापनात राज्य सरकार अपयशी...मुंबई  : काँग्रेसच्या कार्यकाळात राज्याची...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, नारळ,...भात  अवस्था ः पोटरी ते लोंबी बाहेर...
अकोल्यात मूग प्रतिक्विंटल ३८०० ते ५३००...अकोला ः या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी...
सोयाबीन, मूग, उडदासाठी १९ खरेदी केंद्रे...नगर ः शेतकऱ्यांचा शेतमाल हमीदराने खरेदी करता यावा...
शेतीमाल तारण योजनेत शेतकरी उत्पादक...कोल्हापूर : राज्यात शेतीमाल तारण योजना बाजार...
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...