'उजनी'तून भीमेत पुन्हा विसर्ग

उजणी धरण
उजणी धरण

सोलापूर  ः उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग कमी, पण अखंडपणे सुरू आहे. दौंडकडून साडेसहा हजार क्‍युसेक इतके पाणी धरणात सोडण्यात येत आहे. परंतु धरणातील पाणीपातळी ओव्हरफ्लो होऊ नये, यासाठी धरणातूनही पुढे भीमेमध्ये जवळपास १० हजार क्‍युसेक इतके पाणी सोडून पातळी स्थिर ठेवण्यात येत आहे.

गेल्या पंधरवड्यापासून धरणातील पाणीसाठा शंभर टक्‍क्‍यांच्याही पुढे पोचला आहे. पाणीपातळी रोज टप्प्याटप्प्याने कमी-जास्त होत आहे. पण ही पातळी स्थिर ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत. शुक्रवारी (ता. ९) धरणामध्ये ११० टक्के पाणीसाठा झाला होता. त्यानंतर दुपारी चार वाजल्यापासून धरणातून भीमा नदीमध्ये ४० हजार क्‍युसेकने पाणी सोडले जात होते.

मागील आठवड्यापूर्वीच उजनीत येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे धरणातून भीमा नदीमध्ये ७० हजार क्‍युसेकने पाणी सोडले होते. नंतर मात्र ते थांबवले होते. आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्याकडून उजनीकडे पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. कमी असले, तरी अखंडपणे सुरू आहे.

सध्या ते साडेसहा हजार क्‍युसेक इतके आहे. धरणाची पातळी स्थिर ठेवण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतल्यामुळे उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. ४० हजार क्‍युसेकचा विसर्ग शनिवारी दहा हजारापर्यंत ठेवण्यात आला आहे.

उजनीची पाणीपातळी १०८ टक्‍क्‍यांवर धरणाच्या वरच्या बाजूकडून येणाऱ्या पाणी प्रवाहात काहीशी घट झाली आहे. शिवाय पुढेही पाणी सोडले जात असल्याने पाणीपातळी स्थिर आहे. शनिवारी (ता. १०) उजनी धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९७.२१५ मीटरवर आहे. तर एकूण पाणीसाठा ३४५१.२२ दलघमी (१२१.८७ टीएमसी) इतकी आहे. तर उपयुक्त साठा १६४८.४१ दलघमी (५८.२१ टीएमसी) आणि पाण्याची टक्केवारी १०८.६५ टक्के इतके आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com