agriculture news in Marathi, agrowon, 'Ujani' water level at 32 percent | Agrowon

'उजनी'ची पाणीपातळी ३२ टक्क्यांवर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 एप्रिल 2018

सोलापूर  ः वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.

सोलापूर  ः वाढते ऊन आणि पाण्याचा उपसा या दोन्हींमुळे सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. जानेवारी महिन्यात ९९ टक्‍क्‍यांपर्यंत असलेली पाणीपातळी अवघ्या तीन महिन्यांतच निम्म्याहून अधिक प्रमाणात घटली आहे. सोमवारी (ता. ९) दुपारी धरणातील पाणीपातळी ३२.७७ टक्‍क्‍यांवर पोचली होती. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोलापूर जिल्ह्याला उन्हाच्या चटक्‍यांबरोबर टंचाईच्याही झळांना तोंड देण्याची वेळ येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यासाठी उजनी धरणाचे स्थान महत्त्वाचे आहे. विशेषतः पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ आणि मंगळवेढ्याचा काही भाग या पाण्यावरच अवलंबून आहे. या धरणातून सोलापूर शहरासह जवळपास १२० हून अधिक पाणी योजनांना पुरवठा होतो. शिवाय आठमाही योजनेमुळे रब्बी, खरीप आणि आता उन्हाळी हंगामातही शेतीला धरणातून पाणी पुरवले जाते. 

गेल्याच महिन्यात २४ मार्चला शेतीसाठी उन्हाळी हंगामातील पहिली पाळी सोडण्यात आली आहे. सुमारे १५ हजार क्‍युसेक इतके पाणी त्यासाठी सोडले आहे. नियोजनानुसार आणखी एक पाळी सोडण्यात येणार आहे. पण पाण्याची सध्याची स्थिती पाहता, या एका पाळीवरच नियोजन संपवले जाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात ३८ टक्‍क्‍यांवर असलेली पाणीपातळी या दोन-तीन दिवसांत वेगाने घटली आहे. 

सोमवारी (ता. ९) धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९३.२९५ मीटर होती. तसेच २२९९.९४ दलघमी (८१.२२ टीएमसी) इतका एकूण साठा होता. त्यापैकी ४९७.१३ दलघमी (१७.५६ टीएमसी) इतका उपयुक्त साठा होता. तर पाण्याची टक्केवारी ३२.७७ टक्के इतकी होती. सध्या उनाची तीव्रता वाढली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून ४० अंश सेल्सियसच्या पुढे तापमानाचा पारा चढला आहे. येत्या काही दिवसांत ही तीव्रता जसजशी वाढेल, तशी पाणीपातळीत आणखी घट होण्याची आणि टंचाईच्या झळा तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अडगाव बुद्रुक येथे केली एचटीबीटी बियाणे...अकोला : अडगाव बुद्रुक (ता. तेल्हारा) येथे सोमवारी...
ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी नियोजनग्रामीण भागात जलसंधारण जर यशस्वीपणे दीर्घकाळ...
बदलत्या वातावरणाने घटेल भाताचे उत्पादन...भारतामध्ये वातावरण बदलामुळे निर्माण होणाऱ्या...
नगर जिल्ह्यात  ‘उन्नत शेती’बाबत...नगर ः शेतकऱ्यांना अवजारांचा लाभ मिळण्यासाठी...
मराठवाड्यातील १९८ मंडळांत पाऊसऔरंगाबाद  : सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर...
धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत...जळगाव : खानदेशात धुळे जिल्ह्यासह जळगाव,...
नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब लागवड मोठ्या...
सांगली जिल्ह्यात पाऊस बरसलासांगली : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) ठिकठिकाणी...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई : युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे यांनी...
सोलापुरात पाऊस; पण जोर कमीसोलापूर : जिल्ह्यात रविवारी (ता. २३) रात्री...
मुख्यमंत्रिपदाचे काय ठरलेय ते उद्धव...मुंबई  ः युतीचे काय ठरलेय ते उद्धव ठाकरे...
संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज...आळंदी, जि. पुणे  ः  सुखालागी जरी करिसी...
विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ. नीलम...मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापतिपदी डॉ....
पुणे जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात...पुणे   : दुष्काळाने होरपळत असलेल्या...
‘जलयुक्त’मधील गैरव्यवहाराची ‘एसीबी’...मुंबई  ः राज्यात जलयुक्त शिवार अभियानातील...
जळगावात भाजीपाला आवकेत घटजळगाव  ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...
पुणे जिल्ह्यात २२० हेक्टरवर भातपीक...पुणे  ः यंदाच्या खरिपात भात उत्पादनवाढीसाठी...
टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे...पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी...
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...