agriculture news in Marathi, agrowon, under the name of the building Surge irrigation works | Agrowon

नाला खोलीकरणाच्या नावाखाली सुरुंग कामे नको
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

पुणे : राज्यात नाला खोलीकरणाच्या नावाखाली कुठेही सुरुंग लावून खडक फोडण्याची कामे करू नयेत. तसेच, केवळ गाळ व वाळूमुळे बुजलेल्या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करावे, अशा सूचना जलसंधारण विभागाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘जलसंधारण विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरुंग कामाच्या नावाखाली खोटी अंदाजपत्रके तयार होण्याची शक्यता कमी आहे. बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करताना देखील फक्त गाळ व वाळुत बुजलेला भाग काढला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

पुणे : राज्यात नाला खोलीकरणाच्या नावाखाली कुठेही सुरुंग लावून खडक फोडण्याची कामे करू नयेत. तसेच, केवळ गाळ व वाळूमुळे बुजलेल्या बंधाऱ्याचे पुनरुज्जीवन करावे, अशा सूचना जलसंधारण विभागाने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

‘‘जलसंधारण विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरुंग कामाच्या नावाखाली खोटी अंदाजपत्रके तयार होण्याची शक्यता कमी आहे. बंधाऱ्यांचे पुनरुज्जीवन करताना देखील फक्त गाळ व वाळुत बुजलेला भाग काढला जाईल, असे कृषी विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले. 

नाला खोलीकरण म्हणजे पाण्याची साठवण करणे नव्हे हे देखील जलसंधारण विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले होते. ‘‘नाला खोलीकरणातील राज्य शासनाच्या योजनेचा हेतू जमिनीवर पाणी साठे  (सरफेस वॉटर स्टोअरेज) तयार करण्याचा नाही. पाणीसाठा जमिनीच्या वर असल्यास बाष्पीभवनामुळे पाणी वाया जाते. त्याऐवजी जमिनीच्या खाली पाण्याचे पुनर्भरण केल्यास बाष्पीभवन शून्य असते,’’ असे जलसंधारण विभागाने म्हटले आहे. 

नाला खोलीकरणाच्या नावाखाली कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी चुकीचे अंदाजपत्रके तयार करून निधी हडपल्याच्या घटना उघड झाल्यामुळे जलसंधारणाच्या मुळ आदेशाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.  ‘‘मुळात भौगोलिकदृष्ट्या गाळाच्या बझडा क्षेत्रात नाला खोलीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कारण राज्याचा ९६ टक्के भाग कठीण पाषाणाने व्याप्त आहे. यात ९२ टक्के काळा पाषाण, चार टक्के रूपांतरित पाषाण आणि चार टक्के वालुकामय पाषाण असल्याची माहिती एका अभियंत्याने दिली. 

नाला खोलीकरणाच्या कामात केवळ वाळू काढून बिले लाटल्याचा देखील प्रकार काही ठिकाणी झालेला आहे. ‘‘वाळूसाठा असलेल्या भागात नाल्यांचे खोलीकरण करू नये. खोलीकरण फक्त तीन मीटरपर्यंतच असावे. कठीण पाषणात खोदकाम करू नये,’’ असे स्पष्ट आदेश होते. 
बझडा झोन म्हणजे काय?

बझडा झोनमध्ये खोलीकरणाला परवानगी मिळते असे म्हटल्यावर सोन्याचा शोध घ्यावा तसा बझडाच्या शोध घेण्यासाठी कृषी विभागात चढाओढ लागली. सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याच्या टेकड्या संपल्यानंतर बझडा झोन सुरू होत असून, तो लहानमोठ्या टोळदगडांनी, टेकड्यांची धूप झाल्याने वाहून आलेल्या सील्टने बनलेला आहे. बझडा झोनमधील कामांच्या गुणवत्तेचा देखील तपास करण्याचे आव्हान शासनासमोर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...