agriculture news in Marathi, agrowon, Vaccination Case inquiry Complete the before the end of session | Agrowon

लाळ्या खुरकूत प्रकरणाची अधिवेशनापूर्वी चौकशी पूर्ण करा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 मार्च 2018

मुंबई : राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेली लाळ्या-खुरकूत आजारावरची लस खरेदीप्रक्रिया रखडवल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी (ता. ८) विधान परिषदेत केला. त्यावर अधिवेशन संपण्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.

मुंबई : राज्यातील दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या-मेढ्यांना आवश्यक असलेली लाळ्या-खुरकूत आजारावरची लस खरेदीप्रक्रिया रखडवल्याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश देऊनही चौकशी झाली नसल्याचा धक्कादायक खुलासा पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी (ता. ८) विधान परिषदेत केला. त्यावर अधिवेशन संपण्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना फैलावर धरत निविदाप्रक्रियेत घोळ घालून लस खरेदीला उशीर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, इंडियन इम्युनॉलॉजी या कंपनीकडून २०१६ मध्ये वाढीव दराने लस विक्री केल्याबद्दल ९० लाखांचा दंड आकारला होता. तोच न्याय सातव्या निविदेमध्ये मंजूर केलेल्या बॉयोवेट प्रा. लि. या कंपनीला लावणार का, असा प्रश्न उपस्थित केला. 

दोन दिवसांपूर्वीच विधानसभेमध्ये लाळ्या-खुरकूत आजाराच्या लसीवरून पशुसंवर्धनमंत्र्यांना माफी मागावी लागली होती. तीच नामुष्की गुरुवारी (ता. ८) त्यांच्यावर धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधान परिषदेत ओढवली. 

२०१७ मध्ये या लशीच्या खरेदीसाठी तब्बल चार वेळा निविदा काढण्यात आल्या. चौथ्यांदा काढलेल्या निविदेत इंडियन इम्युनॉलॉजी प्रथम पात्र ठरल्यानंतर त्यांना काम देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र त्यांनी अन्य राज्यांत महाराष्ट्रापेक्षा कमी किमतीला निविदा भरल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाचव्यांना निविदा काढण्यात आली. या निविदेत बॉयोवेट कंपनीला काम देण्याचे ठरले होते. मात्र, बॉयोवेट कंपनीने हरयानाला ज्या दरात लस विकली, त्यापेक्षा जास्त दराने महाराष्ट्राला लस विकणार असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. 
 

इतर ताज्या घडामोडी
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...
गनिमी काव्याने राष्ट्रीय किसान...नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे...
बीड जिल्ह्यात एक लाख क्विंटल तुरीचे...बीड  : शासनाने नाफेडमार्फत केलेल्या तूर...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी...पुणे: जिल्ह्यातील भातपट्ट्यातील शेतकऱ्यांनी खरीप...
शिवसेना-भाजपच्या कुरघोडीने युतीवरचे...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी राज्यातील...
पीककर्ज वाटप सुरू करण्याची स्वाभिमानीची...परभणी : उत्पादनात घट आल्यामुळे तसेच...
सांगली जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसांगली : जिल्ह्यातील ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू...
नांदेड विभागातील साखर कारखान्यांची...नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड...
नवीन ९९ लाख लाभार्थी घेतील...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत आता...
नगर जिल्ह्यातील सहा ठिकाणी हरभरा खरेदी...नगर  ः खरेदी केलेला हरभरा साठवणुकीसाठी जागा...
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...