agriculture news in marathi, agrowon, vagitable market analysis, kolhapur district | Agrowon

कोल्हापुरात ओला वाटाणा दहा किलोस ४०० ते ५०० रुपये
राजकुमार चौगुले
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सात ते आठ हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ७०० ते १४०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या आवकेत पंधरा ते वीस टक्क्‍यांनी घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

कोल्हापूर: येथील बाजार समितीत या सप्ताहात ओला वाटाण्याच्या दरात तेजी राहिली. ओल्या वाटाण्यास दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. ओल्या वाटाण्याच्या आवकेत घट झाली. दररोज पंधरा ते वीस पोती वटाण्याची आवक झाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

हिरव्या मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक होती. हिरव्या मिरचीस दहा किलोस ७० ते १६० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची दररोज चारशे ते पाचशे पोती आवक झाली. ढोबळी मिरचीस दहा किलोस ५० ते १६० रुपये दर मिळाला. गवारीच्या आवकेत यंदाच्या सप्ताहात काहीशी सुधारणा दिसून आली. गवारीची दररोज चाळीस ते पन्नास पोती आवक झाली. गवारीस दहा किलोस १०० ते २०० रुपये दर मिळाला.

कारलीची पस्तीस ते चाळीस पाट्या आवक झाली. कारल्यास दहा किलोस १०० ते २०० रुपये दर होता. भेंडीस १०० ते १२५ करंड्या आवक झाली. भेंडीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर होता. काकडीची पन्नास ते शंभर करंड्या आवक होती. काकडीस दहा किलोस ३० ते ८० रुपये दर मिळाला. 

फ्लॉवरची दररोज ३७६ पोती आवक होती. फ्लॅवरला दहा किलोस १५० ते ३०० रुपये दर होता. पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सात ते आठ हजार पेंढ्या आवक होती. कोथिंबिरीस शेकडा ७०० ते १४०० रुपये दर होता. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कोथिंबिरीच्या आवकेत पंधरा ते वीस टक्क्‍यांनी घट झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मेथीची सहा ते सात हजार पेंढ्या आवक हाती. मेथीस शेकडा २०० ते ८०० रुपये दर होता. पालक, पोकळा शेपूस २०० ते ४०० रुपये दर मिळाला.

कांद्याची सात ते आठ हजार क्विंटल आवक झाली. कांद्यास दहा किलोस ५० ते २०० रुपये दर मिळाला. गेल्या सप्ताहाच्या तुलनेत कांद्याचे दर स्थिर असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव बाजार समितीत चवळी प्रतिक्विंटल...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जलयुक्त शिवारातील जलसंचय सुद्धा आटलाजळगाव : जिल्ह्यात झालेल्या जलयुक्त शिवारच्या...
‘स्वाभिमानी’ची २७ ऑक्‍टोबरला जयसिंगपूर...कोल्हापूर  : यंदाच्या हंगामात ऊस उत्पादकांना...
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नगर येथे...नगर  : ``राफेल विमान खरेदीत एक हजार कोटींचा...
तूर, हरभऱ्याच्या चुकाऱ्यासाठी परभणी...परभणी  ः आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
साताऱ्यातील सोयाबीन उत्पादक...सातारा  ः जिल्ह्यात सोयाबीनची काढणी सुरू...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढलीपुणे  : पावसाने दडी मारल्याने पुणे विभागात...
पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर...नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३...
वऱ्हाडात उडीद, मुगासाठी खरेदी केंद्रे...अकोला  ः या भागात सध्या मूग, उडदाचा हंगाम...
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...