भुईमूग
भुईमूग

नागपुरात भुईमूग शेंगेच्या दरात चढउतार

नागपूर ः भुईमूग शेंगांच्या दरातील अपवादात्मक चढउतार वगळता इतर भुसार मालाचे दर गत आठवड्यात स्थिर असल्याचे चित्र होते. भुईमूग शेंगाचे दर ९ सप्टेंबर रोजी १५०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल एवढे खाली आले होते. ९ तारखेचा अपवाद वगळता आठवडाभर हेच दर ४००० ते ४५०० आणि २८०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल होते. 

बाजारात सध्या नवा मूग वगळता इतर शेतमालाची आवक होत नाही. तरीसुद्धा जुने सोयाबीन, हरभरा व इतर भुसार मालाची थोडीफार आवक होतच आहे. सोयाबीनची २७२ ते ५०० क्‍विंटल अशी आवक होत आहे. २५५० ते ३००१ रुपये प्रतिक्‍विंटलचा दर सोयाबीनला मिळत आहे. मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांना चांगली मागणी असून, २४०० ते २७०० रुपये प्रतिक्‍विंटल दराने सोमवारी (ता. ११) विकली गेली. ३००० क्‍विंटल मोसंबीची आवक नोंदविण्यात आली. द्राक्षाची आवक अवघी २१ क्‍विंटल होती. द्राक्ष ४००० ते ६००० रुपये प्रतिक्‍विंटलने विकल्या जात आहेत. डाळिंब दरही १००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटल असे स्थिर आहेत. त्यात वाढीचा कोणताच अंदाज नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. डाळिंबाची आवक १००० ते २३९० क्‍विंटल अशी आहे. बटाटा ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल विकला जात असून, त्यातही तेजीचा अंदाज नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.  बटाट्याची आवक ५९९० क्‍विंटल इतकी आहे. कांदा १००० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल होता. कांद्याची आवक २००० क्‍विंटल इतकी होती. लसून ३००० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा असून, ८८४ इतकी आवक सोमवारी झाली. टोमॅटो १५०० ते १८०० रुपये प्रतिक्‍विंटल आणि आवक १३० क्‍विंटल झाली. टोमॅटोच्या दरातही वृद्धीची शक्‍यता नसल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com