agriculture news in marathi, agrowon, vegetable market rate, Jalgoan | Agrowon

जळगावात वांगी प्रतिक्विंटल १२०० ते २३०० रुपये
चंद्रकांत जाधव
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

बाजार समितीमध्ये मागील शुक्रवारपासून आवकेत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी ४३ क्विंटल एवढी आवक झाली. आवक आसोदे, विदगाव (ता. जळगाव), धरणगाव, एरंडोल, भुसावळ आदी भागांतून होत आहे.

जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरिताच्या वांग्याची आवक वाढू लागली आहे. त्यांना मंगळवारी (ता. ३) प्रतिक्विंटल १२०० ते २३०० आणि सरासरी २००० रुपये दर मिळाला. 

बाजार समितीमध्ये मागील शुक्रवारपासून आवकेत वाढ होऊ लागली आहे. मंगळवारी ४३ क्विंटल एवढी आवक झाली. आवक आसोदे, विदगाव (ता. जळगाव), धरणगाव, एरंडोल, भुसावळ आदी भागांतून होत आहे. यंदा लागवडही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे हिवाळ्यात आवकही कायम राहील, असे सांगण्यात आले.

बाजार समितीत भेंडीची पाच क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल १००० ते २००० आणि सरासरी १५०० रुपये दर होता. गंगाफळाची सहा क्विंटल आवक झाली. त्यांना क्विंटलमागे ९०० ते १५०० आणि सरासरी ११०० रुपये दर होता. फ्लॉवरची सात क्विंटल आवक झाली, त्यास १२०० ते २१०० आणि सरासरी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. गवारीची एक क्विंटल आवक झाली, तीस ३२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

कांद्याची १९० क्विंटल आवक झाली, त्याला ८०० ते १६०० व सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. कारल्यांची पाच क्विंटल आवक झाली, त्यांना १००० ते २००० व सरासरी १३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. पत्ताकोबीची चार क्विंटल आवक झाली, तिला ६०० ते १००० व सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटल दर होता. हिरव्या मिरचीची ४९ क्विंटल आवक झाली, तिला १५०० ते २००० व सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

वाल शेगांची एक क्विंटल आवक झाली, त्यांना प्रतिक्विंटल २४०० रुपये दर मिळाला. मेथीची चार क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ५००० व सरासरी ३५०० रुपये दर होता.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूरात कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीसोलापूर - सोलापुरात मागील चार दिवसांपासून...
नांदेड: माहूर मंडळात मुसळधारमाहूर, जि. नांदेड : गेल्या अनेक दिवसापासून...
औरंगाबादेत श्रावणाची पहिली सरऔरंगाबाद : गेल्या वीस पंचवीस वडीवसंपासून पावसाने...
एक महिन्याच्या विश्रांतीनंतर लातूर...लातूर : गेल्या एक महिन्यापासून गायब झालेल्या...
पोपट पाळल्यास तुरुंगवासमुंबई - घरात पोपट पाळण्याची हौस महागातही पडू...
मराठवाड्यात पावसाची रिपरिप; पिकांना...औरंगाबाद : पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील...
भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे...मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार (वय ७७...
हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर '...नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना...
साताऱ्यात दहा किलो शेवग्यास २५० ते ३००...सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
ऊस तांबेरा नियंत्रणलक्षणे ः १) पानाच्या दोन्ही बाजूंवर लहान, लांबट...
ऊस पीक सल्ला आडसाली लागवडीसाठी दोन सरींमधील अंतर मध्यम...
सस्तन प्राणी प्रजातींचा वंशवेलीसह नकाशा...स्वीडन येथील आर्हस विद्यापीठ आणि गोथेनबर्ग...
केळी उत्पादकांना जोरदार पावसाची...रावेर, जि. जळगाव  : पावसाळ्याचे सव्वादोन...
नगर जिल्ह्यात सोयाबीनने यंदाही सरासरी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढत...
बाजार समितीवर नियुक्त्या न झाल्याने...पुणे ः जिल्ह्यातील महत्त्वाचे आर्थिक सत्ता केंद्र...
कोल्हापुरात धरणक्षेत्रात पाऊस सुरूचकोल्हापूर : धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी (...
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार विनायकराव...सातारा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव...
संत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...
कृषी सल्ला : भात, नागली, आंबा, काजू,...भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने...
श्रावणमासानिमित्त जळगावातून केळीपुरवठा...जळगाव ः जिल्ह्यात दर्जेदार केळीला क्विंटलमागे १५०...