औरंगाबादेत ढोबळी मिरची प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये

ढोबळी मिरची
ढोबळी मिरची

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (ता.३) ढोबळ्या मिरचीची १७ क्‍विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला १५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये मंगळवारी ५ क्‍विंटल आवळ्याची आवक होऊन १००० ते १२०० रूपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १२ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. पत्ता कोबीची आवक ३२ क्‍विंटल; तर दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २८ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॅवरचे दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. हिरव्या मिरचीची आवक ३७ क्‍विंटल तर दर ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहील. भेंडीची आवक ४९ क्‍विंटल होऊन १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २१ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाचे दर २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. मकाची आवक ७४ क्‍विंटल तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४६ क्‍विंटल आवक झालेल्या मोसंबीला १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कांद्याची आवक ३९० क्‍विंटल झाली. कांद्याचा दर ६०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या पपईला प्रतिक्‍विंटल ८०० ते १००० रुपयांचा दर मिळाला. डाळिंबाची आवक ३१९ क्‍विंटल झाली. डाळिंबाचे दर २०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ४९९ क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. टोमॅटोची आवक ९७ क्‍विंटल झाली. या टोमॅटोला ६०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १०६ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचे दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३ क्‍विंटल झालेल्या वालशेंगांना ४००० ते ५००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com