विदर्भात कृषी खात्याचा डोलारा प्रभारींच्या खांद्यावर

विदर्भात कृषी खात्याचा डोलारा प्रभारींच्या खांद्यावर

नागपूर : कृषिमंत्री असलेल्या विदर्भातच कृषी खात्यात रिक्‍तपदांचा डोलारा वाढीस लागला आहे. परिणामी शेतकऱ्यांची कामे प्रभावित होत असून, काही ठिकाणी चक्‍क कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर वरिष्ठ पदांचा भार असल्याचे चित्र आहे.  

जलसंधारण खात्याकडे कृषी विभागाचे कर्मचारी वळते होणार आहेत. कृषी खात्यातील दहा हजारांंवर कर्मचारी जलसंधारण खात्यात जातील, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. कर्मचाऱ्यांनी तसे ऑनलाइन प्रस्तावदेखील सादर केले. परंतु सातत्याने चर्चेशिवाय या संदर्भाने काहीच हालचाली झाल्या नाहीत.

परिणामी कृषी खात्याच्या कामावर ही मरगळ आली असून, रिक्‍तपदे भरण्याची बाबदेखील गंभीरतेने घेतली जात नसल्याची स्थिती आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर राहत असलेल्या खामगाव (जि. बुलडाणा) येथे गेल्या वर्षभरापासून उपविभागीय कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी अशी दोन्ही पदे रिक्‍त आहेत.   

कृषी अधिकाऱ्यांची ४३ पदे रिक्‍त अमरावती विभागात रिक्‍तपदांचा अनुशेष सर्वाधिक आहे. ५६ पैकी ४३ तालुक्‍यांत कृषी अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. या ४३ तालुक्‍यांत कनिष्ठ कर्मचारीच तालुका कृषी अधिकाऱ्यांचा प्रभार पाहत आहेत. त्यामध्ये मेळघाटमधील तालुक्‍यांचादेखील समावेश आहे. अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदही रिक्‍त आहे. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूर जिल्ह्यात तर स्थिती आणखी भयावह असून, एकूण पदाच्या ५० टक्‍के पदे रिक्‍त आहेत. विविध ३४५ पदे नागपूर विभागात रिक्‍त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com