गावाची नाळ न तुटल्यानेच जाणिवा संवेदनशील राहिल्या

पुणे ः चंद्रकांत दळवी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अभिनेते नाना पाटेकर यांनी सत्कार केला.
पुणे ः चंद्रकांत दळवी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त अभिनेते नाना पाटेकर यांनी सत्कार केला.

पुणे  ः ‘‘गावाची नाळ न तुटल्यानेच जाणिवा संवेदनशील राहिल्या. समाजात वावरल्याने सुख-दुःखाची व्याख्या सारखी बदलत गेली, यामुळे तू तुझ्यासारखी माणसे गाेळा करून गावाचा कायापालट केलास. तुझ्या कार्यामुळेच तुझ्या निराेप समारंभाला माझ्या पुरुष नाटकाएवढी गर्दी झाली आहे. यामुळे तुझ्या पुढील कामासाठी तू म्हणशील तिथे आणि वाट्टेल ते काम करायला माझ्यासह संपूर्ण सभागृह तयार आहे,’’ अशी साद ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांना घातली. निमित्त हाेते दळवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कृतज्ञता आणि गाैरव साेहळ्याचे. 

सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मित्र परिवाराच्या वतीने कृतज्ञता आणि गाैरव साेहळा गुरुवारी (ता. ५) नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन कळमकर, सनदी अधिकारी शेखर गायकवाड, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे, माजी सनदी अधिकारी दिलीप बंड, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, पराग करंदीकर, संजय आवटे, उद्याेजक हणमंत गायकवाड, रामदास माने, सहनिंबधक ज्याेती लाटकर, सह्याद्री फार्मचे विलास शिंदे, आनंद काेठडिया, धर्मेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित हाेते. 

पाटेकर म्हणाले, ‘‘राजकारण्यांच्या काेंडाळ्यात राहून चांगले काम करणारा अधिकारी पाहिला नाही. तुझ्या जाणिवा संवदेनशील असल्यामुळे तू गाव आणि शेतकऱ्यांसाठी चांगले काम करू शकला. पुढील आयुष्यात देखील आम्ही तुझ्याबराेबर राहू.’’ 

कुलगुरू करमाळकर म्हणाले, ‘‘मराठी म्हणीप्रमाणे तुम्ही दगडाला पाझर फुटावे असे काम निढळ गावात करून दाखविले आहे. अशा कामांमधून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचे अवघड काम तुम्ही करावे, यासाठी तुम्ही विद्यापीठासाेबत दुष्काळमुक्ती आणि ग्रामविकासासाठी काम करावे, यासाठी मी तुम्हाला विनंती करताे.’’

सत्काराला उत्तर देताना दळवी म्हणाले, ‘‘हागणदारी मुक्त गावे करण्याची याेजना आणली त्या वेळी या नावाला माझ्या घरातूनच विराेध हाेता, तर पत्रकारांनी देखील नाव बदलण्याच्या सूचना केल्या. मात्र गावकऱ्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत समजावे म्हणून हा शब्द कायम ठेवला व हाच शब्द मग पॉवरफुल हाेऊन याेजना यशस्वी झाली. याचप्रकारे सरकारी कामांमधील हागणदारी एक दिवस बंद झाली पाहिजे. गावाकडे चला हा महात्मा गांधींचा संदेश आता खऱ्या अर्थाने पूर्ण झाला पाहिजे यासाठी प्रत्येक गाव निढळ झाले पाहिजे यासाठी प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. अशा नागरिक, कार्यकर्त्यांसाेबत मी भविष्यात कार्यरत राहणार आहे.’’ 

या वेळी मान्यवरांनी मनाेगत व्यक्त केले. नाना पाटेकर यांच्या हस्ते दळवी यांचा महात्मा फुले पगडी, शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com