agriculture news in Marathi, agrowon, Water conservation works fast in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात जलयुक्तच्या कामांना वेग
टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 एप्रिल 2018

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांना गती देण्यात आली असून, तलाव दुरुस्ती व बंधारे दुरुस्तीची कामे वेगात सुरू आहेत. जेथे पाणी अडविणे लवकर शक्‍य आहेत, त्या कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जी कामे यंदाच्या आर्थिक वर्षात केली जातील, त्यांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेण्याची तयारीही केली आहे. 

जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांना गती देण्यात आली असून, तलाव दुरुस्ती व बंधारे दुरुस्तीची कामे वेगात सुरू आहेत. जेथे पाणी अडविणे लवकर शक्‍य आहेत, त्या कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. जी कामे यंदाच्या आर्थिक वर्षात केली जातील, त्यांची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करून घेण्याची तयारीही केली आहे. 

कामांचा दर्जा कसा आहे हेदेखील महत्त्वाचे असून, त्यासंबंधीची कार्यवाही आतापासून हाती घेतली आहे. काही कंत्राटदारांनी कामे मिळविण्यासाठी मंजूर निधीपेक्षा २५ ते ३० टक्के कमी दरात काम करण्याची तयारी निविदेत दाखविली. ई-निविदा प्रक्रिया असल्याने ही कामे द्यावी लागली. परंतु मंजूर निधीपेक्षा कमी दरात चांगल्या दर्जाची कामे कशी होतील, असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला आहे. २२२ गावांमध्ये यंदा जलयुक्त शिवार अभियानातून विविध कामे करायची असूून, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभाग पाझर तलाव दुरुस्ती, साठवण बंधारे, कोल्हापूर बंधारे दुरुस्ती आदी कामे करील. सुमारे ३० कोटी रुपये खर्चाची कामे लघुसिंचन विभाग करणार आहे.

मागील वित्तीय वर्षातील सुमारे २२ अपूर्ण कामेही पूर्ण करायची आहेत. ही बाब लक्षात घेता कामांना गती देण्यात आली असून, उशिराने कामे करणाऱ्या कंत्राटदारांना सक्त ताकीद अभियंत्यांनी दिली आहे. तसेच, जिल्हा परिषद सदस्यांनाही कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी, सूचना करण्याची तोंडी मंजुरी दिली असून, यामुळे कामे चांगली व गतीने होतील, असा उद्देश असल्याची माहिती मिळाली. 

त्रयस्त संस्थेकडून कामांची तपासणी करण्यासंबंधीची सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आली आहे. त्यासंबंधी पदाधिकारी मात्र अनभिज्ञ असून, तपासणी करायची की नाही याचे पूर्ण अधिकार जिल्हा परिषदेला असणार आहे. २०१६ मध्ये जिल्हा परिषदेने त्रयस्त संस्थेकडून कामांची तपासणी करून घेतली होती. त्यात अनेक कामांमध्ये तांत्रिक दोष आढळले होते. या प्रकरणी चौकशीही झाली होती आणि संबंधित ठेकेदारांची बिले रोखण्यात आली होती, अशी माहिती मिळाली.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...