agriculture news in Marathi, agrowon, in the water cup competition Nashik district Two villages | Agrowon

वॉटर कप स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील दोन गावे
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

नाशिक  : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत शुक्रवार (ता. २७) पासून श्रमदान करण्यासाठी गावे एकत्र येणार आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.

नाशिक  : दुष्काळी गावे पाणीदार बनविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे आणि धोंडबार या दोन गावांत शुक्रवार (ता. २७) पासून श्रमदान करण्यासाठी गावे एकत्र येणार आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागणाऱ्या या गावांतील रहिवाशांनी दुष्काळाशी दोन हात करण्याचा संकल्प केला असून, गावातील नागरिक सर्व व्यवहार बंद करून श्रमदान करणार आहेत. सकाळी ७ वाजेपासून या श्रमदानाला प्रारंभ होणार आहे.

अभिनेते आमीर खान यांच्या बहुचर्चित वॉटर कप स्पर्धेमध्ये राज्यातील तीनशेपेक्षा अधिक गावांनी सहभाग घेतला आहे. वर्षानुवर्षे गावातील पाण्याचे स्रोत बंद झाल्याने तसेच पाणी वाहून जात असल्याने राज्यातील असंख्य गावे दुष्काळग्रस्त आहेत.

या गावांना पाणीदार गाव बनविण्यासाठी गावामध्येच श्रमदानाची भावना निर्माण करून नागरिकांना पाणीदार गावासाठी प्रवृत्त करण्याची आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनची योजना आहे. अगोदर गावाने पाण्यासाठी उभे राहावे आणि नागरिकांना पाण्याचे महत्त्व पटावे यासाठी गावकऱ्यांना या मोहिमेत सहभागी करून घेतले जात आहे.

या मोहिमेत सिन्नर तालुक्यातील वडझिरे, धोंडबार या गावांमधील नागरिक श्रमदान करणार असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य, शासकीय अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हेदेखील या मोहिमेत सहभागी होऊन ग्रामस्थांना पाणी मोहिमेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. ग्रामस्थांच्या श्रम मोहिमेतून दुष्काळाचा शाप पुसण्यासाठी, नवा इतिहास घडविण्यासाठी अवघ्या गावातून श्रमदानाचे तुफान आले पाहिजे, या भूमिकेतून गिते हे ग्रामस्थांचे मनोबल उंचावणार आहेत.

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...