agriculture news in Marathi, agrowon Water from Pinjar Damanganga valley to Marathwada says Chief Minister | Agrowon

मराठवाड्याला पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून पाणी : मुख्यमंत्री
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

नांदेड  ः मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्राने पळवले आहे. या २१ पैकी १४ टीएमसी पाण्याचा पत्ताच लागत नाही. आता ७ टीएमसी पाणी देण्याचे काम सुरू आहे. या २१ टीएमसी पाण्यासह आणखी ५० टीएमसी पाणी पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा करत केंद्र सरकारकडून ५० हजार कोटी रुपये निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १९) सांगितले.

नांदेड  ः मराठवाड्याच्या वाट्याचे कृष्णा खोऱ्यातील २१ टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्राने पळवले आहे. या २१ पैकी १४ टीएमसी पाण्याचा पत्ताच लागत नाही. आता ७ टीएमसी पाणी देण्याचे काम सुरू आहे. या २१ टीएमसी पाण्यासह आणखी ५० टीएमसी पाणी पिंजार-दमणगंगा खोऱ्यातून मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात आणणार असल्याचा दावा करत केंद्र सरकारकडून ५० हजार कोटी रुपये निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १९) सांगितले.

लोहा (जि. नांदेड) येथे आयोजित विकासकामांच्या ई-भूमिपूजन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या वेळी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, खासदार डॉ.‍ सुनील गायकवाड, आदींची प्रमुख उपस्थिती.

श्री. फडणवीस पुढे म्हणाले, सरकार रस्ते, वीज,‍ पाणी या विषयांना प्राधान्य देण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील चार हजार गावांमध्ये एकात्मिक शेती सुधार योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेने सहा हजार कोटी रुपये कर्ज देण्याचे मान्य केले आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री यांनी दिली.

श्री. गडकरी म्हणाले, की राज्यातील राष्ट्रीय महामार्गावर १७० ब्रीज कम बंधाऱ्यांची कामे हाती घेतली आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल. 

सेकंड जनरेशन इथेनाॅलच्या निर्मितीला मान्यता
शेतमालाच्या खरेदीसाठी सरकारला मर्यादा आहेत. पेट्रोल, डिझेल या इंधनांना पर्याय म्हणून पऱ्हाट्या, बांबूपासून सेकंड जनरेशन इथेनाॅलच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल तसेच रोजगार निर्मिती होईल. मक्या पासून थर्ड जनरेशन इथेनाॅलची निर्मिती करता येते. त्यासाठी उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील बायो फ्युएलची पाॅलिसी तयार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलसंपदा, नदी विकास मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी (ता.१९) परभणी येथे केले.
 

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...