agriculture news in Marathi, agrowon, Water supply by 391 tankers in all 13 districts of the state | Agrowon

राज्यातील तेरा जिल्ह्यांत ३९१ टँकरने पाणीपुरवठा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे : गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावागावांत पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यांतील ४०१ गावे व दहा वाड्यांना ३९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे : गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गावागावांत पाणीटंचाई वाढू लागली आहे. सध्या राज्यातील तेरा जिल्ह्यांतील ४०१ गावे व दहा वाड्यांना ३९१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून झालेल्या कामामुळे भूजलपातळीत चांगली वाढ झाली होती. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी होण्याची शक्यता होती. मात्र, काही ठिकाणी कमी पाऊस आणि अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई उग्र रूप धारण करू लागली आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात व वाड्या-वस्त्यावर वाढू लागली आहे. 

नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. सध्या नागपूर व ठाणे विभागात पाणीटंचाई नसली, तरी उर्वरित भागात पाणीटंचाईस सुरवात झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात १६४ गावे २१३ वाड्यांवर १५४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येते. 

मराठवाड्यातही पाणीटंचाईने तीव्र रूप धारण करण्यास सुरवात केली आहे. मराठवाड्यातील २०५ गावे ८ वाड्यांवर २५२ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील १६९ गावांमध्ये २०६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यातील सोळा गावांमध्ये २०, परभणीतील सहा गावे व एका वाडीवर आठ, हिंगोलीतील दोन गावांत एक टँकर, नांदेडमधील बारा गावे सात वाड्यांवर सतरा टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत पाण्याची स्थिती अजूनही चांगली आहे. 

विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. अकोला जिल्ह्यातील ५९ गावांमध्ये ४६ टँकर, वाशीमधील सात गावात सात टँकर, बुलडाण्यातील बारा गावांत बारा टँकर, यवतमाळमध्ये वीस गावांमध्ये वीस टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असून, भूगर्भातील पाण्याचा कमी उपसा करण्याची गरज आहे .  

मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे भरून भूजलपातळीत वाढ झाली होती. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई सुरू झाली आहे. पुणे विभागातील साताऱ्यांतील प्रत्येकी एका गावात व वाडीवर गेल्या महिन्यापासून एका टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे. नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सोळा गावे व एका वाडीला नऊ टँकर, धुळे जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये नऊ टँकरने, जळगावमधील ७१ गावांमध्ये ३५ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 

विभागनिहाय सुरू झालेले टँकर
विभाग             गेल्या वर्षीची टँकर संख्या    यंदाची टँकर संख्या 
कोकण                           १२                               -
नाशिक                          १४                              ५३ 
पुणे                               ४०                               १ 
औरंगाबाद                      ८८                              २५२
अमरावती                        -                               ८५     
एकूण                             १५४                             ३९१ 
 

 

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...