agriculture news in Marathi, agrowon, we Ignored the questions of farmers | Agrowon

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे आमच्याकडून दुर्लक्षच
टीम अॅग्रोवन
रविवार, 1 एप्रिल 2018

नगर  ः ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यात सहभागही घेतला आहे. असे असले, तरी आमच्या पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षच झाले, अशी कबुलीही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे दिली. 

‘मोदीमुक्त भारत’साठी देशातील सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले असले, तरी परप्रांतीयांबाबत असलेली आमची भूमिका कायम आहे असे ते म्हणाले. नगर येथे पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर शुक्रवारी (ता. ३०) आले होते.

नगर  ः ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे, तर त्यात सहभागही घेतला आहे. असे असले, तरी आमच्या पक्षाकडून शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्षच झाले, अशी कबुलीही मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी येथे दिली. 

‘मोदीमुक्त भारत’साठी देशातील सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले असले, तरी परप्रांतीयांबाबत असलेली आमची भूमिका कायम आहे असे ते म्हणाले. नगर येथे पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर शुक्रवारी (ता. ३०) आले होते.

पक्षाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधला. ते म्हणाले, ‘ठाकरे यांनी अगोदर मोदी यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती. त्या वेळी त्यांनी जे चित्र उभे केले होते, ते फसवे असल्याचे आता समोर आल्यामुळे ‘मोदीमुक्त’ची भूमिका घेतली आहे. राज्यामध्ये अगोदर मराठी तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे. त्याला डावलून परप्रांतीय तरुणाला रोजगार देणे खपवून घेतले जाणार नाही. आजही हीच भूमिका आहे. ‘मोदीमुक्त’साठी ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचे आवाहन केले असले, तरी आमची भूमिका कायम आहे. त्यामुळे ज्यांना यायचे असेल, त्यांनी आमच्याबरोबर यावे.’ 

सुरवातीला मनसे पक्ष चांगला वाढला. चौदा आमदार निवडून आले होते, नाशिकमध्येही सत्ता मिळविली; मात्र ही हवा आमच्या डोक्‍यात गेल्यामुळे पक्षाची आजची अवस्था झाली,’ अशीही कबुली त्यांनी दिली. तसेच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना पर्याय म्हणून आमच्याकडे पाहू नका, तर राज्यातील प्रश्‍न सुटण्यासाठी उपाय म्हणून आमच्याकडे पाहिले जावे, असेही ते म्हणाले. 

पवार यांच्याविषयीही तेवढाच आदर  

गुढीपाडव्याला राज ठाकरे यांनी केलेले भाषण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लिहून दिलेले होते, असा आरोप होत असल्याकडे लक्ष वेधले असता नांदगावकर म्हणाले, ‘राजसाहेबांना भाषण लिहून देण्याची वेळ आलेली नाही. पवार ज्येष्ठ नेते आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती जेवढा आदर होता, तेवढाच आदर पवार यांच्याप्रती आहे. पवार-राज ठाकरे भेटीत राजकीय असे काहीही नाही.’

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...