agriculture news in Marathi, agrowon, We only supported the government | Agrowon

आम्ही फक्त सरकारला टेकू दिलाय
टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 एप्रिल 2018

नगर  ः भाजपकडून एकीकडे युतीसाठी हात दिला जातो आणि दुसरीकडे पाठीत वार केले जात आहे. त्यामुळे युतीचे (भाजप-शिवसेना) सरकार असे अजिबात म्हणून नका, आम्ही फक्त टेकू दिल्याचे शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

नगर  ः भाजपकडून एकीकडे युतीसाठी हात दिला जातो आणि दुसरीकडे पाठीत वार केले जात आहे. त्यामुळे युतीचे (भाजप-शिवसेना) सरकार असे अजिबात म्हणून नका, आम्ही फक्त टेकू दिल्याचे शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महापालिकेतील एका जागेच्या पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी (ता. 7) सायंकाळी शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामुळे मंत्री कदम यांच्यासह परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी नगरला भेट दिली. पत्रकारांशी बोलताना मंत्री कदम म्हणाले, "नगर शहरासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढली आहे. मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद असल्याने सारी जबाबदारी त्यांच्यावर जाते. केडगावला झालेला हा प्रकार कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजप यांच्या संगमताने झाला आहे.

फक्त उमेदवार उभा करायचा आणि सगळी मते कॉंग्रेसला द्यायची हा भाजपचा जुनाच फंडा आहे. भाजपकडून एकीकडे युतीसाठी हात दिला जातो आणि दुसरीकडे पाठीत वार केले जात आहे. त्यामुळे युतीचे सरकार असे अजिबात म्हणून नका, आम्ही फक्त टेकू दिला आहे. नगमधील प्रकरणाबाबत सोमवारी (ता. 9) मुख्यमंत्र्यांना भेटून वस्तुस्थिती मांडणार असून सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व पोलिस निरिक्षक अभय परमार यांच्या पाठबळाने गुंडगिरी वाढत असल्याने त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत.

दरम्यान आमदार संग्राम जगताप, आमदार शिवाजी कर्डीले व आमदार अरुण जगताप यांच्यासह चाळीस लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत. आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना अटक केली असून त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...