राज्यात काही ठिकाणी मुसळधार

मंगळवार(ता. 12)पर्यंत कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.
उपग्रह छायाचित्र वेळ दुपारी १२. १५ मिनिट
उपग्रह छायाचित्र वेळ दुपारी १२. १५ मिनिट

पुणे ः राज्यातील काही भागांत हवेचा दाब कमी झाल्याने मध्य महाराष्ट्रातील बारामती, पाडेगाव येथे मुसळधार पाऊस पडला.

कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला असून, कोकणातील भात, तर मध्य महाराष्ट्रातील तूर, बाजरी, मराठवाडा व विदर्भातील कापूस, तूर, सोयाबीन पिकांना दिलासा मिळाला.

येत्या सोमवार(ता. 11)पर्यंत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. आज (शनिवारी) मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे.

सध्या राज्यातील काही ठिकाणचे हवेचे दाब 1000 ते 1004 हेप्टापास्कलच्या दरम्यान आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

शुक्रवारी (ता. 8) कोकणातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मावळ, मुळशी, नाशिकमधील इगतपुरी, साताऱ्यातील महाबळेश्वर येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी कडक ऊन पडले होते. त्यामुळे हवामानात आर्द्रता वाढून कमाल तापमानातही वाढ झाली होती. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत हलका पाऊस पडला. अनेक भागांत हवामान ढगाळ होते. काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र आहे.

गुरुवारी (ता. 7) सायंकाळी कोकणातील हर्णे येथे 80 मिलिमीटर पाऊस पडला. तर मंडणगड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख येथेही 70 मिलिमीटर पाऊस पडला. तर शिरगाव, ताम्हिणीच्या घाटमाथ्यावर 70, कोयना 60 मिलिमीटर पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातील बारामती येथे सर्वाधिक 130 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पडेगाव येथे 110, खटाव, वडूज, मोहोळ, फलटण येथे 90 मिलिमीटर पाऊस पडला. मराठवाड्यातील वाशी येथे 110 मिलिमीटर पाऊस पडला.

तर भूम, उमरगा येथे 80, आष्टी, पाटोदा येथे 70 मिलिमीटर पाऊस पडला. विदर्भातील मौदा येथे 80 मिलिमीटर पडला. दिग्रस येथे 60, काटोल 50, अरणी 40 मिलिमीटर पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी (ता. 8) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) कोकण ः हर्णे 80, महाड, मंडणगड, पोलादपूर, संगमेश्वर देवरूख 70, दापोली 60, श्रीवर्धन 50, गुहागर, म्हसळा 40, चिपळून, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी 30, माणगाव 20, दोडामार्ग, खेड, लांजा, राजापूर, सांगे 10. मध्य महाराष्ट्र ः बारामती 130, पडेगाव 110, खटाव, वडुज, मोहोळ, फलटण 90, अक्कलकोट, माळशिरस, मंगळवेढा 80, आटपाडी, कराड, सांगोला, सातारा, विटा, वाई, जत, जेऊर, पंढरपूर 60, इंदापूर, जामखेड, करमाळा, माढा, पुरंदर, सासवड, राधानगरी, सांगली, श्रीगोंदा, तासगाव 50, चांदगड, कर्जत, वेल्हे 40, बार्शी, भोर, दौंड, जावळीमेधा, खंडाळा, बावडा, कोरेगाव, पलूस, पन्हाळा, पाथर्डी, पुणे, शेवगाव, शिरोळ, वाळवा, इस्लामपूर 30, नगर, आजरा, दहिवडी, गडहिंग्लज, गारगोटी, हातकणंगले, कडेगाव, कवठेमहाकाळ, महाबळेश्वर, मिरज, नेवासा, पाटण, पौंड, मुळशी, शाहूवाडी, शिरूर, घोडनदी, सोलापूर 20, गगनबावडा, शिराळा, वडगावमावळ 10. मराठवाडा ः वाशी 110, भूम 90, उमरगा 80, आष्टी, पाटोदा 70, वडवणी 60, अहमदपूर, चाकूर, गेवराई, जालना, लोहारा, परंडा, रेणापूर, शिरूर कासार 50, अंबड, देगलूर 40, बिल्लोली, ढालेगाव, गंगाखेड, परळी वैजनाथ, पूर्णा, सेलू 30, अंबेजोगाई, औरंगाबाद, बदनापूर, धारूर, गंगापूर, केज, कळंब, मानवत, मुखेड, नायगाव, खैरगाव, उस्मानाबाद, पाथरी, सोनपेठ, तुळजापूर, उदगीर 20, घनसांगवी, हिमायतनगर, हिंगोली, जळकोट, जिंतूर, कळमनुरी, माजलगाव, मुदखेड, पैठण, वसमत 10. विदर्भ ः मौदा 80, दिग्रस 60, काटोल 50, अरणी 40, चिमूर, घाटंजी, पांढरकवा, यवतमाळ 30, भामरागड, दारव्हा, कामठी, लाखानी, मूर्तिजापूर, नांदगाव, काजी, नेर 20, अहिरी, अंजनगाव, चिखलदरा, धानोरा, जळगाव, जामोद, कळंब, महागाव, मोहाडी, नागपूर, नांदुरा, नरखेडा, राळेगाव, रिसोड, सिंरोचा 10. घाटमाथा ः शिरगाव, ताम्हिणी 70, कोयना (पोफळी) 60, दावडी 50, डुंगरवाडी 40, भिरा, अंबोणे 30.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com