agriculture news in marathi, agrowon, weather, forecast | Agrowon

तुरळक ठिकाणी हलक्‍या सरींचा अंदाज
संदीप नवले
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे ः सध्या राज्यात अनेक भागांतील हवेचा दाब 1004 हेप्टापास्कलहून अधिक झाला आहे. पावसाचा अनेक भागांतील जोर कमी झाला आहे. आज (शनिवारी) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

पुणे ः सध्या राज्यात अनेक भागांतील हवेचा दाब 1004 हेप्टापास्कलहून अधिक झाला आहे. पावसाचा अनेक भागांतील जोर कमी झाला आहे. आज (शनिवारी) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्‍या सरी बरसण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.

शुक्रवारी (ता. 22) राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली. गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पडत असलेल्या पावसाचा जोर गुरुवारी (ता. 21) काहीसा ओसरला. सायंकाळी कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी ढग भरून आल्याने अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. राज्यातील 34 मंडळांत 70 मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.

येत्या मंगळवार (ता. 26) पर्यंत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील 29 मंडळांत अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्रातील नगर, सोलापूर जिल्ह्यातील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली.

मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी पिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी (ता.22) विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील काकड परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.

कोकणात विभागात शुक्रवारी (ता. 22) सकाळपर्यंत ठाण्यातील किन्हवली, बदलापूर मंडळांत अतिवृष्टी झाली. रायगडमधील कर्नाळा, कोपरोळी, जसाई, पाली, अतोने, जांभूळपाडा, पेण, हमरापूर, वाशी, कसू, कामर्ली, रोहा, मुरूड, नांदगाव, बोरळी, श्रीवर्धन, वळवटी, बोरलीपंचटन, म्हसाळा, रत्नागिरीतील चिपळूण, खेर्डी, रामपूर, सावर्डे, शिरगाव, दापोली, अंजर्ला, वाकवली, देव्हरे मंडळांत अतिवृष्टी झाली.

उर्वरित ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांतील अनेक मंडळांत हलका ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बरसला. तर सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अरणगाव, सोलापुरातील नारी मंडळात अतिवृष्टी झाली. तर पुणे, नगर, सोलापूर, सातारा जिल्ह्यांतील अनेक मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस पडला. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडला.

खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील काही मंडळांत हलका पाऊस पडला. उर्वरित भागात ढगाळ हवामान होते. तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही ऊन सावल्याचा खेळ सुरू होता. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. तर बीड, लातूर, उस्नानाबाद जिल्ह्यातही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर नांदेड, हिगोलीतील काही मंडळांत हलका पाऊस पडला. जालना आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी ढगाळ, तर काही वेळा ऊन पडल्याचे चित्र होते.

सध्या मराठवाड्यात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंप्री, गडचिरोलीतील चामोर्शी मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. तर वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यांतील काही मंडळांत हलक्‍या स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

मंडळनिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
ठाणे ः किन्हवली 96.6, बदलापूर 98
रायगड ः कर्नाळा 103, कोपरोळी 98, जसाई 88, पाली 107, अतोने 89, जांभूळपाडा 86, पेण 105, हमरापूर 97, वाशी 138, कसू 965, कामर्ली 86, रोहा 88, मुरूड 82, नांदगाव 78, बोरळी 79, श्रीवर्धन 102, वळवटी 93, बोरलीपंचटन 94.3, म्हसाळा 137.2.
रत्नागिरी ः चिपळूण 120, खेर्डी 118, रामपूर 72, सावर्डे 94, शिरगाव 76, दापोली 104, अंजर्ला 192, वाकवली 89, देव्हरे 88.
नगर ः अरणगाव 77
सोलापूर ः नारी 70
चंद्रपूर ः गोंडपिंप्री 89.4.
गडचिरोली ः चामोर्शी 109

इतर ताज्या घडामोडी
सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप...राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा...
जमीन सुपीकतेसाठी गावनिहाय कार्यक्रम हवा...देशात हरितक्रांती अत्यावश्यक होती. मात्र, ...
निर्यातक्षम मोसंबीसाठी एकच बहर घ्यावा...जालना :  निर्यातक्षम मोसंबी उत्पादनासाठी...
सुबोध सावजींचा विहिरीतच मुक्कामअकोला ः पाणीपुरवठा योजनांच्या कामात मोठ्या...
साखर दरप्रश्नी सरकारने हस्तक्षेप करावा...लातूर ः केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना...
जागेवरच कुजवा सेंद्रिय घटकमी १९७० मध्ये कोल्हापूरमध्ये शेती करण्यास प्रारंभ...
धोरणकर्त्यांना शेतमाल उत्पादकांपेक्षा...बारामती, जि. पुणे : देशातील धोरणकर्त्यांना शेतमाल...
शिफारशीत मूग जातींची निवड महत्त्वाची...गेल्या काही वर्षांमध्ये मुगाचे दर वाढते असल्याने...
माफसू : मुलाखतीपासून उमेदवार वंचितनागपूर : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान...
पिंक बेरी, भुरी, क्रॅकिंग टाळण्यासाठी...सध्याच्या वाातावरणामध्ये द्राक्ष बागेमध्ये पिंक...
तंत्र उन्हाळी तीळ लागवडीचे...सुपीक व उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत...
खानदेशात अजूनही कांदा लागवड सुरूचजळगाव : धुळ्यासह जळगाव जिल्ह्यात अजूनही कांदा...
गोड दह्याच्या निवळीपासून तेलाची...योगर्ट (दही) निर्मिती उद्योगामध्ये गोड...
आर. बी. हर्बल अॅग्रोचे ‘भू-परीस’...मार्केट ट्रेंडस्.. आर. बी. हर्बल अॅग्रो ही...
ई-नामसाठी डायनॅमिक कॅश क्रेडिट बंधनकारकपुणे ः आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार याेजनेत (ई-...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विस्तारतेय ऊसशेतीसिंधुदुर्ग : आंबा, काजू व अन्य मसाला पीक...
मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवारबीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र...
माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलनअकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील...
शासकीय निधी खर्चाची माहिती आता एका क्‍...रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा...
जळगावात चवळी शेंगा २००० ते ३००० रुपये...जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...