बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजय र
ताज्या घडामोडी
पुणे ः सध्या राज्यातील अनेक भागांत हवेचा दाब वाढल्यामुळे पावसाचा जोर ओसरणार आहे. बुधवार (ता. १३) पर्यंत कोकण, गोव्यात काही ठिकाणी पावसाचा, तर आज (रविवारी) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, बुधवारपर्यंत कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी हलका पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, बारा मंडळात अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यातील वागरूळ मंडळात १००, शेवळी ८७, शेळगाव ११०, तीर्थपुरी ९७, रांजनी ९७, तळनी ९५, पांगरी मंडळात १२० मिलिमीटर पाऊस झाला. बुलडाणा जिल्ह्यातील तुळजापूर मंडळात ७४, तर सिंदखेड राजा मंडळात ९० मिलिमीटर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील असुर्डे, शिरगाव मंडळात मुसळधार पाऊस झाला.
राज्यात शनिवारी (ता. ९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणातील रत्नागिरी, ठाणे जिल्ह्यांतील काही ठिकाणी तर रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून, अनेक मंडळांत ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते.
गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील तूर, कापूस, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन, भात पिकांना दिलासा मिळाला. विदर्भात बुलडाणा जिल्ह्यात पाऊस पडला. उर्वरित भागात हलका पाऊस पडला. अकोला, वाशीम जिल्ह्यांतील काही मंडळांत हलका पाऊस पडला असून, अनेक भागांत ढगाळ हवामान होते.
- 1 of 346
- ››