सोलापुरात मेथी, कोथिंबीर प्रतिपेंढी १२ रुपये
सुदर्शन सुतार
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

कांद्याची सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. स्थानिक भागातील आवक तुलनेने फारच कमी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते २१०० व सरासरी ११०० रुपये असा दर मिळाला.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भाज्यांना मागणी वाढली. त्यांचे दरही चांगलेच वधारले. मेथी, कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांना प्रत्येकी १२०० रुपये दर मिळाला. त्यानुसार प्रतिपेंढी १२ रुपये इतका दर शेतकऱ्यांच्या पदरात पडला. त्याशिवाय दोडका, गवार, भेंडीचे दरही पुन्हा तेजीतच राहिले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. भाज्यांची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. फक्त कोथिंबिरीची आवक नजीकच्या उस्मानाबाद, लातूर भागातून झाली; पण मागणी चांगली असल्याने भाज्यांचे दर चांगलेच वधारले. यापूर्वीच्या सप्ताहाच्या तुलनेत दरामध्ये चांगलीच सुधारणा झाली. त्यातही मेथी, कोथिंबिरीला चांगला उठाव मिळाला.

मेथी आणि कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी प्रत्येकी ५०० ते १२०० व सरासरी ८०० रुपये इतका दर मिळाला. त्याशिवाय शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय फळभाज्यामध्ये दोडका, गवार, भेंडीलाही या सप्ताहात पुन्हा मागणी राहिली. त्यांचे दरही टिकून होते. दोडक्‍याची आवक रोज २०० क्विंटल, गवारची २० क्विंटल आणि भेंडीची ३० क्विंटल इतकी आवक राहिली. दोडक्‍याला प्रतिदहा किलोसाठी १०० ते १८० रुपये, गवारला २०० ते ४०० रुपये, भेंडीला १५० ते ३५० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर टिकून
कांद्याची आवक आणि दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिले. त्यांची आवक रोज प्रत्येकी ४० ते ७० गाड्या झाली. कांद्याची सगळी आवक बाहेरील जिल्ह्यातून झाली. स्थानिक भागातील आवक तुलनेने फारच कमी राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते २१०० व सरासरी ११०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
जळगावमध्ये नवती केळी १०२५ रुपये क्विंटल जळगाव ः मागील आठवड्याच्या सुरवातीला जिल्ह्यात...
सोलापुरात वांगी, कोबी, ढोबळी मिरचीच्या... सोलापूर ः येथील बाजार समितीच्या आवारात गत...
एक लाख हेक्टरने हरभऱ्याचा पेरा वाढणारपुणे : राज्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी...
राज्यात दुधाचा एकच ब्रॅँड बनविणार :...राहुरी, जि. नगर : गुजरातमधील ‘अमूल’प्रमाणेच...
जनताप्रश्नी सरकार अधिक संवेदनशील :...नवी दिल्ली ः ``जनतेच्या प्रश्नी सरकार अधिक...
पुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची...पुणे  ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून...
बुलेट-ट्रेनसाठी महाराष्ट्राला २५ हजार...नगर : मुंबई- अहमदाबाद बुलेट-ट्रेनऐवजी चंद्रपूर ते...
पावसाचा केळी, कापूस, मका, ज्वारीला फटका यावल, जि. जळगाव  : शहर व परिसरात या...
परभणीत गहू, हऱभऱ्याचे क्षेत्र वाढण्याची... परभणी : येत्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यात २...
दहा लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखालीच परभणी : अद्यापर्यंत पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस...
बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणारमुंबई : शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध...
नाशिक जिल्ह्यात कर्जमाफीचे अडीच लाखांवर...नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाच्या... सातारा  ः दिवाळीचा सण तीन आठवड्यांवर आला...
पुण्यात कोथिंबीर शेकडा २५०० रुपये पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
संतुलित पुरवठ्यामुळे एेन नवरात्रात... आठवडाभरात ब्रॉयलर्सच्या बाजारात जोरदार वाढ...
गुरुवारपर्यत काही ठिकाणी हलक्‍या...पुणे ः राज्यात हवेचा दाब वाढत आहे. त्यामुळे...
बिहारकडून ८० अब्ज पूरग्रस्त निधीची मागणीनवी दिल्ली ः बिहारमध्ये येऊन गेलेल्या...
कर्जमाफीवरून पंजाबमध्ये अारोप-...चंडीगड, पंजाब ः पंजाबमध्ये शेतकरी...
सुधारित पद्धतीमुळे मका पिकात फायदा...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...
योग्य व्यवस्थापनातून हरभरा उत्पादनात...शेतकरी नियोजन रब्बीतील विविध पिकांमध्ये...