agriculture news in Marathi, agrowon, What is the procedure for Panchnama ask by Jayant Patil | Agrowon

पंचनाम्यांसाठी शेतकऱ्यांच्या हाती पाट्या देणे ही काय पद्धत?
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 मार्च 2018

मुंबई : गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. ही पंचनाम्याची पद्धत आहे का, असा संतप्त सवाल सरकारला मंगळवारी (ता.६) राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांशी असा व्यवहार होणार असेल, तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे, हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. गारपिटीचे पंचनामे करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हातात पाट्या घेऊन फोटो काढण्यात आले होते. या संदर्भात ॲग्रोवनमध्ये सर्वप्रथम वृत्त देण्यात आले होते. 

मुंबई : गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. ही पंचनाम्याची पद्धत आहे का, असा संतप्त सवाल सरकारला मंगळवारी (ता.६) राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी विधानसभेत केला. शेतकऱ्यांशी असा व्यवहार होणार असेल, तर या सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे, हे दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली. गारपिटीचे पंचनामे करताना अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे हातात पाट्या घेऊन फोटो काढण्यात आले होते. या संदर्भात ॲग्रोवनमध्ये सर्वप्रथम वृत्त देण्यात आले होते. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला वारंवार सांगूनही सरकार काहीच करत नसून ते कोडगे बनले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणीही पाटील यांनी या वेळी केली. विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या वतीने गारपीट, बोंड अळीच्या प्रश्नावर चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. 

राज्याचे कृषी खाते बेजबाबदारपणे काम करत असून, हा कृषी खात्याचा अकार्यक्षम कारभाराचा नमुना आहे, अशी टीका पाटील यांनी केली. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने आयातीवर निर्बंध घालण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तरीही आयात वाढत चालली आहे. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. तुरीला कवडीमोल भाव दिला जात आहे. गारपिटीने शेतकऱ्यांना झोडपले असताना सरकार मदत करायला तयार नाही, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, गारपिटीचे पंचनामे करताना शेतकऱ्यांच्या हातात पाटी देण्यात आली. यारून सरकारची शेतकऱ्यांबाबत काय मानसिकता आहे हे दिसून येते, असेही पाटील म्हणाले.
 

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...