agriculture news in Marathi, agrowon, Whole Maharashtra To bring under solar energy | Agrowon

संपूर्ण महाराष्ट्र सौर ऊर्जेवर आणणार : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 मार्च 2018

मुंबई : मागील ३ वर्षांत ४ लाख २८ हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीजजोडण्या दिल्या असून भविष्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या व उपसा सिंचन योजनांसह संपूर्ण महाराष्ट्र सौर ऊर्जेवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान सभेत सांगितले.

मुंबई : मागील ३ वर्षांत ४ लाख २८ हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना वीजजोडण्या दिल्या असून भविष्यात राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या व उपसा सिंचन योजनांसह संपूर्ण महाराष्ट्र सौर ऊर्जेवर आणण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान सभेत सांगितले.

२०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी वरील माहिती सभागृहात दिली. या वेळी सभागृहाने ऊर्जा विभागाच्या ८,४२० कोटींच्या मागण्या मंजूर केल्या. मंजूर करण्यात आलेल्या अनुदानापैकी ७,०१० कोटी रुपये शेतकरी व यंत्रमागाच्या सबसिडीसाठी खर्च होतात, असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले, यंदा देशातील सर्वात मोठे काम म्हणजे एलिफंटा बेटावर म‍हावितरणने वीज पोचवण्याचे आहे. या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" या कार्यक्रमात घेतली. गेल्या ऑक्टोबरमध्ये एक आठवडा सोडला तर राज्यात ३ वर्षांत कुठेही भारनियमन नाही.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत जमीन उपलब्ध झाली, तर ३००-४०० शेतकऱ्यांचा एक गट करून शेतकऱ्यांना दिवसा १०-१२ तास शाश्वत वीज उपलब्ध होईल. लवकरच ४१ लाख शेतकऱ्यांचा कृषिपंपाचे कनेक्शन सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला शासनाकडून ६३२ कोटी सब्सिडी विदर्भाला, १०२२ कोटी मराठवाडा, २२ कोटी कोकणला, २७९४ कोटी सब्सिडी पश्चिम महाराष्ट्राला देण्यात येते.

गेल्या तीन वर्षांत विदर्भातील १ लाख ६६ हजार, मराठवाड्यातील १ लाख १५ हजार, कोकणात १५ हजार, उत्तर महाराष्ट्रात ४०६३३ व पश्चिम महाराष्ट्रात १ लाख १६ हजार शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना कनेक्शन देण्यात आले. 

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...