agriculture news in Marathi, agrowon, Why should the farmers plant the BJP flags in the field? | Agrowon

शेतकऱ्यांनी शेतात भाजपचे झेंडे पेरावेत का
टीम अॅग्रोवन
रविवार, 27 मे 2018

बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे पीककर्ज वाटप ठप्प झालेले आहे. पेरणीचा काळ जवळ आला असून, आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशा स्थितीत त्याने आपल्या शेतात भाजपचे झेंडे लावावेत का, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

बुलडाणा (प्रतिनिधी) ः शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. यामुळे पीककर्ज वाटप ठप्प झालेले आहे. पेरणीचा काळ जवळ आला असून, आता शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशा स्थितीत त्याने आपल्या शेतात भाजपचे झेंडे लावावेत का, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आसूड यात्रेनिमित्त ते खामगाव येथे बोलत होते. राज्यातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, निराधार व बेरोजगारांच्या हक्कासाठी आमदार कडू यांच्या नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी ते मराठवाड्यातील भोकरदनपर्यंत आसूड यात्रा काढली जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या विदर्भातून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन गावापर्यंत ही आसूड यात्रा प्रहार संघटनेने आयोजित केली आहे. शुक्रवारी (ता. २५) ही यात्रा खामगावमध्ये दाखल झाली. 

आमदार कडू म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना त्यांनी स्वामिनाथन आयोग लागू केला नाही. आता तेच हल्लाबोल करीत आहेत. काँग्रेसने हल्लाबोल यात्रेदम्यान शेतकऱ्यांची जाहीर माफी मागायला हवी होती; परंतु त्यांनी तसे केले नाही. सत्तेत येण्यापूर्वी भाजपचे नेते आमचा एक सैनिक शहीद झाल्यास त्यांचे दोन मारू अशी भाषा करीत होते; परंतु आता आमच्या शेतकऱ्यांच्या जिवावर उठून पाकिस्तानची साखर भाजपने आयात केली आहे. शेतमालाला भाव देण्याऐवजी परदेशातून शेतमाल आयात करण्याचे धोरण हे सरकार राबवित आहे. 

कृषिमंत्र्यांच्या बुलडाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना गारपीट, बोंड अळीसह इतर नुकसानभरपाई अद्यापही मिळालेली नाही. पेरणीआधी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास कृषिमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या घरात घुसून आंदोलन करू, असा इशारा आमदार कडू यांनी दिला.

इतर ताज्या घडामोडी
समुद्राच्या उधाणामुळे पीक नुकसान ...मुंबई  : समुद्र किनाऱ्यावरील शेतीचे तसेच...
‘मग्रारोहयो’त २८ नव्या कामांचा समावेशनागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
पुणे जिल्ह्यात तीन लाख जमीन...पुणे   ः जमिनीतील विविध घटकांची माहिती...
पुणे जिल्हा परिषदेत दर रविवारी ‘...पुणे  : स्वयंसहायता समूहाच्या (बचत गट)...
गोदावरी कालव्यांचे लोकसहभागातून...कोपरगाव, जि. नगर ः शंभर वर्षांहुन अधिक आयुर्मांन...
सातारा जिल्ह्यात रब्बीत अवघे नऊ टक्के...सातारा  ः रब्बी हंगामात पीक कर्जाकडे...
महालक्ष्मी सरस प्रदर्शनामुळे  ग्रामीण...मुंबई   ः ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या...
सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा :...सोलापूर  ः उसाची एकरकमी एफआरपी देण्यात साखर...
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
पीकनिहाय सेंद्रिय खत व्यवस्थापनपशुपालनातून जमिनीची सुपीकता हा विषय आता...
परोपजीवी मित्र-कीटकांची ओळखसध्या केवळ कीडनियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या...
खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रापाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रासायनिक खतांचा...
परभणीत काकडी १००० ते १५०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...