देशव्यापी शेतकरी संपात निकराची लढाई लढणार

अकोला ः सेवाग्राम येथील बैठकीला उपस्थित राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी.
अकोला ः सेवाग्राम येथील बैठकीला उपस्थित राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी.

अकोला  ः सेवाग्राम येथे बुधवारी (ता. ९) झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या राष्ट्रीय सभेत अागामी देशव्यापी शेतकरी संपात निकराची लढाई लढण्याचा निर्णय घेण्यात अाला, अशी माहिती या महासंघातर्फे देण्यात अाली.

सेवाग्राम येथे राष्ट्रीय किसान महासंघाच्या देशव्यापी कोअर कमिटीचे सदस्य संदीपअाबा गिड्डेपाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी देशभरातून १३० प्रतिनिधी उपस्थित होते. यात शिवकुमार शर्मा, गुरनाम चंढूणी, डाॅ. बुधाजीराव मुळीक, संतवीर सिंग, सुरेश कौथ, राजकुमार गुप्ता, रणजीत राजू, महेश सिंग, अभिमन्यू कोहाड, लक्ष्मण वंगे आदींची उपस्थिती होती.

या बैठकीत घेतलेल्या ठरावानुसार देशव्यापी शेतकरी संप जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी हिंदी व इतर भाषिक पत्रके देशभर पोचवणार, अांदोलनात इतर संघटनांना सहभागी करून घेण्यासाठी चार सदस्यांची समिती गठीत करणार, ३१ मे पूर्वी विविध राज्यांमध्ये उपोषण, धरणे अांदोलन, १ ते १० जून दरम्यान दूध, फळे, धान्य, भाजीपाला यांचा पुरवठा थांबवणार, संपादरम्यान अांदोलनाला पाठिंबा देणारे नेते वगळून इतर मंत्री व नेत्यांना गावामध्ये प्रवेश बंद अशा प्रकारचे ११ ठराव घेण्यात अाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com