agriculture news in Marathi, agrowon, will punish them those who do defame ? | Agrowon

बदनामी करणाऱ्यांना शिक्षा देणार की नाही?
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई : मागील २५ ते ३० वर्षांच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्रिपदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँटिकरप्शन, सीआयडी, लोकायुक्तमार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत कारवाईबाबत धोरण स्पष्ट करावे, असे आवाहनही विधानसभेत मंगळवारी (ता. ६) केले.

मुंबई : मागील २५ ते ३० वर्षांच्या काळात सभागृहाचा सदस्य असताना एकही आरोप झाले नाहीत. मात्र मंत्रिपदावर बसल्यावर माझ्यावर वारेमाप आरोप करण्यात आले. त्या आरोपांची अँटिकरप्शन, सीआयडी, लोकायुक्तमार्फत चौकशी केली. मात्र त्यातील माझ्यावरचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही. बेछूट आरोप करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करणार का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी करत कारवाईबाबत धोरण स्पष्ट करावे, असे आवाहनही विधानसभेत मंगळवारी (ता. ६) केले.

मूळ प्रश्न वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आणि माझ्यावर काही जणांनी आरोप करत आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशा आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी श्री. ठाकूर यांनी केली.

या मुद्द्याला सभागृहातील सर्व आमदारांनी उचलून धरले. यावर अनेकांनी बोलण्याची इच्छा प्रकट केली. धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनीही या मुद्द्याला उचलून धरत धनंजय मुंडेंची सीडी मी स्वतःच व्हायरल केली, असे सांगितले. याचा एकदा सोक्षमोक्ष लागू द्या असे ते म्हणाले. गोटे यांच्याकडे तीनशे सीडी असल्याबाबत ते मीडियाशी बोलले, त्या ताब्यात घ्या आणि चौकशी करा, असेही ठाकूर म्हणाले. यावर तथ्यहीन आरोप करून लोकप्रतिनिधींची बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करता येऊ शकेल याबाबत नियम तपासले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. 

इतर बातम्या
संजय धोत्रे चौथ्यांदा लोकसभा...अकोला :  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू...
लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१...मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत आज पहिल्या व...
शेती, बेरोजगारी, वाहतूक कोंडी प्रश्‍...पुणे : जिल्ह्यातील ‘शेतीसंपन्न’ आणि ‘औद्योगिक...
भाजपच्या चार विद्यमान खासदारांचा पत्ता...मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने...
बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद : मराठवाड्यातील बीड व...
वर्षावनातील विविधतेसाठी किडी,...संशोधकांना उष्ण कटिबंधीय वर्षावनातील विविधतेने...
शिक्षण,विज्ञानाच्या प्रगतीकडे लक्ष...वाळवा, जि. सांगली : ‘‘स्वबळावर उत्पादन क्षमता...
सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घटसातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम...
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या...
अंकलगी तलाव आटू लागलासांगली : जत पूर्व भागातील ४१ गावांना पाणीपुरवठा...
मराठवाड्यातील प्रकल्पांतील उपयुक्‍त...औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा...
पशुधन सहायकांच्या पदोन्नतीप्रकरणात...नागपूर : निकष डावलून राज्यातील पशुधन सहायकांना...
दक्षिण महाराष्ट्रात पक्षांपेक्षा ‘...कोल्हापूर: राज्याच्या इतर भागांप्रमाणे दक्षिण...
पिनाकीचंद्र घोष लोकपालपदीनवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी...
नाशिक शहरात धावणार 'ई- पिंक रिक्षा'नाशिक : नाशिक शहरातील हिरकणी अटल अभिनव सहकारी...
व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह नवे नौदलप्रमुखनवी दिल्ली: व्हाइस ॲडमिरल करमबीरसिंह यांची भारतीय...
नगर : चार छावण्यांची परवानगी रद्दनगर : पशुधन वाचविण्यासाठी छावणीला मंजुरी...
औरंगाबादेत चिंच २५०० ते ८५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
तमिळनाडूतील १११ शेतकऱ्यांचे मोदींना...तिरुचिरापल्ली, तमिळनाडू : विविध मागण्यांकडे...
भर दुष्काळात राज्यातील शेळ्या-मेंढ्या...नगर ः दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी छावण्या...