agriculture news in Marathi, agrowon, Work of pananchams in Jalgaon district continues | Agrowon

जळगाव जिल्ह्यात पंचनाम्यांचे काम सुरूच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 मार्च 2018

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) झालेल्या वादळी पावसात सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, पंचनामे सुरूच आहे. पंचनाम्यांसह नुकसानीची प्राथमिक माहितीचा आढावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

जळगाव : जिल्ह्यात शनिवारी (ता. १७) झालेल्या वादळी पावसात सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून, पंचनामे सुरूच आहे. पंचनाम्यांसह नुकसानीची प्राथमिक माहितीचा आढावा कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

जिल्ह्यात वादळी पावसात भुसावळ, जामनेर, पाचोरा, जळगाव भागांत वृक्ष उन्मळून पडले. अनेक शेतकऱ्यांचे आंबे, रामफळ आदी डेरेदार वृक्ष जमिनदोस्त होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मका, गहू ही पिके आडवी झाली. पंचनामे कृषी विभागाकडून सुरूच असून, प्राथमिक माहिती प्रशासनाने जारी केली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ४७२ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात यावल तालुक्‍यात ३६, जामनेरात ४१६ आणि पाचोरा तालुक्‍यात २० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावल व जामनेरात केळीचे मिळून ६५.४० हेक्‍टरवर नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 

परंतु यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. ते कृषी विभागाने गृहीत धरलेले नाही. शिवाय कर्मचारी पंचनाम्यांसाठी गावोगावी पोचलेच नाहीत, असा आरोप ग्रामस्थ, शेतकरी करीत आहे. सुमारे एक हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात झाल्याचे काही जाणकार, कृषितज्ज्ञांचे म्हणणे आहे. २० ते २५ टक्के या स्वरूपात ते आहे. हे नुकसानही कृषी विभागाने गृहीत धरावे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मका, दादर, गहू ही पिके लोळली आहे. दादरची कणसे जमीनदोस्त झाल्याने त्यांचा दर्जा खालावला आहे. तर मक्‍याचे पीक अनेक ठिकाणी अर्ध्यापासून मोडले आहे. त्यात मक्‍याची दाणे पक्व होणार नाहीत. त्याचे १०० टक्के नुकसान होईल. फक्त चाराच हाती येईल. तरीही प्रशासन मात्र हे नुकसान गृहीत धरीत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

यावल व चोपडा तालुक्‍यांत कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्याची माहिती प्राथमिक अहवालात दिसत नाही. यातच प्रशासनाने पंचनामे सुरू ठेवले असून, नेमकी माहिती या आठवड्याच्या अखेरीस समोर येईल, असे संबंधितांचे म्हणणे आहे.

इतर बातम्या
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
फळबागा तोडण्याची शेतकऱ्यांवर वेळजवळगाव, जि. बीड ः दुष्काळी परिस्थितीने...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...