ठिबक अनुदानासाठी चुकीचे अर्ज रद्द होणार
मनोज कापडे
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरताना चूक झाली असल्यास अर्ज ‘डिलिट’ करण्याची सुविधा न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज रद्द करून घ्यावे लागतील. तसेच अनुदानासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा दोन लाख शेतकऱ्यांनी ठिबकसाठी अर्ज केले आहेत. यातील किती अर्ज चुकीचे आणि किती बरोबर याचा डाटा कृषी विभागाकडे उपलब्ध नसून, शेतकऱ्यांना ऑनलाइन भरलेला अर्ज चुकीचा असल्याची माहिती फक्त डीलरकडेच मिळणार आहे.

पुणे : कृषी खात्याच्या ठिबक अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज भरताना चूक झाली असल्यास अर्ज ‘डिलिट’ करण्याची सुविधा न देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज रद्द करून घ्यावे लागतील. तसेच अनुदानासाठी पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

यंदा दोन लाख शेतकऱ्यांनी ठिबकसाठी अर्ज केले आहेत. यातील किती अर्ज चुकीचे आणि किती बरोबर याचा डाटा कृषी विभागाकडे उपलब्ध नसून, शेतकऱ्यांना ऑनलाइन भरलेला अर्ज चुकीचा असल्याची माहिती फक्त डीलरकडेच मिळणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना भलत्याच डोकेदुखीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 
आतापर्यंत एक लाख ३३ हजार शेतकऱ्यांच्या प्रस्तावांना कृषी विभागाने पूर्वसंमती दिली आहे. पूर्वसंमती असली तरच शेतकरी अनुदानाला पात्र ठरतो. मात्र, आता चुकीचा अर्ज भरल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘अर्ज चुकीचा भरल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्याने सरळ तालुका कृषी कार्यालयात जाऊन आधीचा अर्ज रद्द करून घ्यावा. त्यानंतर पुन्हा अर्ज भरल्यानंतर संबंधित शेतकरी अनुदानास पात्र राहतील.

मुळात अर्ज भरताना दुरुस्तीसाठी ऑप्शन देण्याची आवश्यकता होती. मात्र, दुरुस्तीचा पर्याय (ऑप्शन फॉर डिलिट) देण्यास राज्य शासनाने नकार दिल्याचे तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान‘शेतकऱ्याचा चुकीचा अर्ज संबंधित कार्यालयाने रद्द केला, तरी पूर्वसंमतीची रक्कम तालुकास्तरावरच जमा राहील,’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले. 

आठ दिवसांत पूर्वसंमती देणार - पोकळे 
‘ई-ठिबक ऑनलाइन प्रणालीत चुकीचा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात कमी असण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी आधार कार्ड आणि बॅंक खाते पुस्तकात नावात किरकोळ बदल असल्यामुळे अर्ज अपात्र ठरत आहेत. अर्ज रद्द केला तरी आम्ही नव्या अर्जाला आठ दिवसांत संमती देणार आहोत,’ असे फलोत्पादन संचालक प्रल्हादराव पोकळे यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...