गतवर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्‍केच आंबा बाजारात

थ्रिप्समुळे सुकलेला मोहोर.
थ्रिप्समुळे सुकलेला मोहोर.

रत्नागिरी ः वातावरणाचा तडाख्यामुळे या वर्षी मार्च महिन्यातील वाशी बाजारपेठेतील आवक गतवर्षीच्या तुलनेत अवघी २५ टक्‍केच झाली आहे. गतवर्षी या वेळी आठ ते नऊ हजार पेटी कोकणातून जात होती; मात्र या वर्षी दोन हजार पेट्याच वाशीत जात आहे. 

सध्या तापमान ३६ ते ३८ अंश सेल्सिअसमध्ये स्थिरावल्यामुळे मागील पाच दिवसांत आंबा वेगाने तयार होत आहे; मात्र बारीक कैरी उन्हामुळे पिवळी पडून गळून जात आहे. हापूसबरोबर केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून येणाऱ्या आंब्याचीही आवक घटल्याचा दावा वाशीतील व्यावसायिकांनी केला. त्यामुळे दर स्थिर आहे. सध्या वाशीत हापूसचा दर पेटीला तीन ते सहा हजार रुपये आहे.

आवकच घटल्याने हा दर कायम राहील असा अंदाज आहे. गेल्या आठ दिवसांमध्ये उष्णतेची लाट संपूर्ण महाराष्ट्रात आली आहे. पाराही ३४ अंश सेल्सिअसवरून पुढे सरकू लागला आहे. २७ फेब्रुवारीला रत्नागिरी जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसची नोंद झाली. 

ओखीमुळे हंगाम एक महिना लांबला आहे. मार्च महिन्यात येणाऱ्या पिकावर संक्रात आली असून मार्चमध्ये कोकणातून अवघ्या दोन हजार पेटीच आंबा वाशीला रवाना झाला आहे. ३ मार्च २०१७ ला नऊ हजार पेटी रवाना झाली होती; मात्र ३ मार्च २०१८ ला अवघी २३०० पेटी आंबा बाजारात दाखल झाल्याची नोंद आहे.

वाशीतून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या चार दिवसांत सरासरी दोन हजार पेट्या येत आहेत. यापूर्वी सरासरी अवघ्या चारशे ते सहाशे पेट्या येत होत्या. तापमानामुळे आवक वाढल्याचे सांगण्यात आले. दर घसरला तर मात्र बागयातदारांवर संक्रात येण्याची शक्‍यता आहे. वाढत्या तापमानाचा फटका बारीक कैरीला बसत आहे. सकाळच्या सत्रात धुके आणि वातावरण थंड असते. दुपारच्या सत्रात कडक उन्ह असल्याने आंब्याला वाचविण्यासाठी बागायतदारांना फवारणीचा आधार घ्यावा लागत आहे.

वाढत्या उष्म्यामुळे कैरी पिवळी पडत असून, एप्रिलमधील उत्पादनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. सर्वसामान्यांना आंबा चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. - प्रसन्न पेठे, बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com