agriculture news in Marathi, agrowon,commodity Festival ignore by Consumers | Agrowon

रणरणत्या उन्हातील धान्य महोत्सवाकडे ग्राहकांची पाठ
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 एप्रिल 2018

नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असतानाच याच रणरणत्या उन्हात सेंद्रिय धान्यमहोत्सव घेत नव्या विक्रमाची नोंद नागपूरच्या आत्मा यंत्रणेने आपल्या नावे केली आहे. मात्र, हा धान्यमहोत्सव केवळ औपचारिकताच ठरला असून, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने सहभागी शेतकऱ्यांचादेखील हिरमोड झाला आहे. 

नागपूर  ः विदर्भाचा उन्हाळा राज्यात सर्वदूर प्रसिद्ध असतानाच याच रणरणत्या उन्हात सेंद्रिय धान्यमहोत्सव घेत नव्या विक्रमाची नोंद नागपूरच्या आत्मा यंत्रणेने आपल्या नावे केली आहे. मात्र, हा धान्यमहोत्सव केवळ औपचारिकताच ठरला असून, ग्राहकांनी पाठ फिरविल्याने सहभागी शेतकऱ्यांचादेखील हिरमोड झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्याच्या प्रयत्नातून राज्यात सर्वदूर धान्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन आणि त्याच जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या उपस्थितीत समारोप असा प्रोटोकॉल या महोत्सवाकरिता निश्‍चित करून प्रत्येकी सुमारे १४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. शेतकरीहिताऐवजी भाजपचे ब्रँडिंग करण्याचा उद्देश साधण्यावरच या महोत्सवातून भर दिला गेला. त्याच्या परिणामी अकोला आणि नागपूर येथे हे महोत्सव अपयशी ठरले. 

अकोला येथे २८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत महोत्सव घेतला गेला. या महिन्यात उन्हाचा पारा ४२ ते ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे असतो. त्यामुळे ग्राहकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरविली. अकोल्याचे आमदार रणधीर सावरकार यांनी आत्मा अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्यतेवर त्या वेळी चांगलीच टीका केली. दरम्यान, या संदर्भाने प्रतिक्रियेसाठी कृषी सचिव विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तर कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा मोबाईल बंद होता. 

अनुभवातून शहाणपण नाहीच
अकोल्यात उन्हाच्या तीव्रतेमुळे ग्राहक धान्यमहोत्सवात फिरकलेच नाहीत. या अनुभवातून शहाणे होणे नागपूर आत्माच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित होते; परंतु तसे न होता नागपूर आत्माकडून २१ एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत धान्यमहोत्सव भरविण्यात आला आहे. कृषी विद्यापीठाच्या नागपूर प्रक्षेत्रावरील एका शेतात साधा मंडप टाकून त्यात स्टॉल लावण्यात आले. इतर कोणत्याच सुविधा या ठिकाणी नसल्याने ग्राहकांनी या महोत्सवाकडे पाठ फिरविली. 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...