agriculture news in marathi, Aher fish found in ujjani dam | Agrowon

उजनीत सापडला दुर्मीळ आहेर मासा
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

इंदापूर, जि. पुणे ः तालुक्‍यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बाभूळगाव येथील बाबा मोरे, अमित कावरे, बापू माने यांच्या जाळ्यात दुर्मीळ तसेच औषधी गुणधर्म असणारा साडेसहा किलो वजनाचा 'आहेर' जातीचा मासा सापडला. या माशास इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोन हजार रुपयेप्रमाणे तेरा हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

इंदापूर, जि. पुणे ः तालुक्‍यातील उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बाभूळगाव येथील बाबा मोरे, अमित कावरे, बापू माने यांच्या जाळ्यात दुर्मीळ तसेच औषधी गुणधर्म असणारा साडेसहा किलो वजनाचा 'आहेर' जातीचा मासा सापडला. या माशास इंदापूर मासळी बाजारात प्रतिकिलो दोन हजार रुपयेप्रमाणे तेरा हजार रुपये असा उच्चांकी भाव मिळाल्याची माहिती इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

उजनी जलाशयात वेगवेगळ्या जातींचे ३० प्रकारचे मासे आढळतात. मात्र, जलाशयात मत्स्यबीज सोडण्यात हेळसांड झाल्याने व चिलापी माशाच्या आक्रमणामुळे कटला, मरळ, रहू, शिंगाडा, चांभारी, वाम हे पूर्वी मुबलक प्रमाणात मिळणारे मासे सध्या कमी प्रमाणात मिळत आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वांत मोठा मासेमारीचा व्यवसाय उजनी धरण व पाणलोट क्षेत्रात चालतो. धरणातील मासे परदेशांतही पाठविले जातात. या धरणात चिलापी व चांभारी जातीचे मासे मुबलक प्रमाणात मिळतात. इंदापूर मासळी बाजारात चिलापी जातीच्या माशाला मोठी मागणी आहे. उजनी धरणातील गोड्या पाण्यातील माशांना मुंबई, हैदराबाद, कोलकता येथील बाजारपेठेत चांगली मागणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...