agriculture news in marathi, Ahmednagar faces lowest temperature in state, Maharashtra | Agrowon

नगर गारठले; सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पुणे : देशातून माॅन्सून परतल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू झाले. राज्यातील नगर आणि परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमध्ये १२.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे : देशातून माॅन्सून परतल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू झाले. राज्यातील नगर आणि परभणी येथील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंशांपर्यंत घट झाली. गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत नगरमध्ये १२.७ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आज (ता. २७) पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. पुणे परिसरातही बुधवार (ता. १) पर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सध्या वातावरणातील आर्द्रता कमी होत असून, हवामान कोरडे होऊ लागले आहे. त्यातच सूर्य दक्षिणेकडे काही प्रमाणात सरकला असून, सूर्यकिरणे तिरपी पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे. उत्तरेकडून वाहत असलेल्या वाऱ्यामुळे किमान तापमानात हळूहळू घट होऊ लागली आहे.

गुरुवारी सकाळपर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्याच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या उर्वरित भागांत किंचित वाढ झाली. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकणातील रत्नागिरी येथे ३६.३ अंश सेल्सिअसची सर्वांत जास्त कमाल तापमानाची नोंद झाली. 

विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली. मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्याच्या काही भागांत किंचित घट झाली. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. परभणी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५.२ अंश सेल्सिअसने घट होऊन १४.३ अंश सेल्सिअसची किमान तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ नगरमध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. नागपूर, कोल्हापूर, जळगाव, अकोला येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत दोन ते अडीच अंश सेल्सिअसने घट झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

गुरुवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंतचे कमाल आणि किमान (कंसात) तापमान अंश सेल्सिअसमध्ये : मुंबई ३४.७ (२५.०), सांताक्रूझ ३६.१ (२३.३), अलिबाग ३२.०, रत्नागिरी ३६.३ (२३.७), डहाणू ३५.० (२२.२), पुणे ३१.७ (१६.४), नगर - (१२.७), जळगाव ३५.२(१६.२), कोल्हापूर ३१.२ (२१.५), महाबळेश्वर २८.६ (१८.०), मालेगाव ३४.० (१६.५), नाशिक ३२.३ (१४.३), सांगली - (२०.१), सातारा ३३.१ (१७.५), सोलापूर ३४.२ (१८.०), उस्मानाबाद ३२.१ (१४.३), औरंगाबाद ३३.४ (१५.८), परभणी ३४.२ (१४.३), नांदेड ३५.५ (१९.०), अकोला ३५.४ (१७.१), अमरावती ३१.८ (१७.०), बुलडाणा ३२.० (१७.५),  ब्रह्मपुरी ३५.० (१८.२), चंद्रपूर ३४.४ (२०.२), गोंदिया ३३.६ (१७.२), नागपूर ३४.२ (१६.५), वर्धा ३४.० (१७.०), यवतमाळ ३४.५ (१५.४).

इतर अॅग्रो विशेष
चढ्या दराचा फायदा कोणाला?मागील दोन दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढत आहेत....
अतिखोल भूजलाचा उपसा घातकचपर्यावरणाचा नाश कोणी केला? या एका प्रश्नाला अनेक...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
दराअभावी कांदापट्टा सुन्ननाशिक : कांद्याला अगदी मोड फुटेस्तोवर वाट...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
अर्थसंकल्पीय कृषी कर्ज तरतूदीत १० टक्के...नवी दिल्ली : आगामी २०१९-२०च्या अर्थसंकल्पात शेती...
राज्यात शुक्रवारपासून पावसाचा अंदाजपुणे : वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताची...
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...