agriculture news in marathi, Ajit Nawale says, all parties meet on 15 November, Maharashtra | Agrowon

मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५ नोव्हेंबरला मुंबईत परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे ठरवून २८ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला मोदी सरकारला घेरण्यासाठी कूच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी दिली.

कोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५ नोव्हेंबरला मुंबईत परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये भाजप वगळता इतर सर्व पक्षांना निमंत्रित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी या पक्षांची नेमकी काय भूमिका आहे हे ठरवून २८ ते ३० नोव्हेंबरच्या दरम्यान दिल्लीला मोदी सरकारला घेरण्यासाठी कूच करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सेक्रेटरी डॉ. अजित नवले यांनी दिली.

किसान सभेच्या वतीने येथे राज्यभरातील कार्यकर्त्यांचे दोनदिवसीय कार्यशाळेचे उदघाटन सोमवारी (ता. २२) झाले त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय किसान सभेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावीत, माजी आमदार संपतराव पवार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. नवले म्हणाले, की किसान सभेने लाॅँग मार्चच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांनी सरकारवर दबाव टाकून शेतकरी प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही. दुष्काळ, विविध पिकांचे हमीभाव, हमीभाव केंद्रांची मागणी आदींसाठी आम्हाला पुन्हा आंदोलन करावे लागणार आहे. यासाठीचे नियोजन या दोनदिवसीय बैठकीत होणार आहे. आमच्याबरोबर अनेक संघटना शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नावर आंदोलन करतात. आंदोलन तीव्र करतात. पण ऐन निर्णयाच्या वेळी कचखावू निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा विश्‍वासघात करतात. आम्ही तसे होऊ देणार नाही. आमची संघटना व्यक्ती केंद्रीत नाही. आम्ही धोरणासाठी लढणारे लोक आहोत. संपूर्ण कर्जमुक्ती व शेतमालाला किफायतशीर दाम मिळविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.

डॉ. ढवळे म्हणाले, की स्वातंत्र्यानंतर गेल्या साडेचार वर्षांत शेतकऱ्याला खूप वाईट दिवस आले. इतर सरकारांनी थोड्या थोड्या प्रमाणात तरी कर्जमाफी केली. परंतु मोदी सरकारने कर्जमाफी तर केली नाहीच. या उलट अनेक बड्या उद्योगपतींची कर्जे माफ केली. हे सरकार आता बाजूला काढण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. दुष्काळ, भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन देण्याबाबतचा लढा तीव्र करण्यत येर्इल.

या वेळी श्री गावीत, डॉ. उदय नारकर, श्री पवार पाटील, किसन गुजर, अर्जुन आडे यांची भाषणे झाली. सुभाष निकम यांनी प्रास्ताविक केले. संभाजी यादव यांनी आभार मानले.

शेतकरी संघटनांवर टीकेची झोड
डॉ. नवले यांनी शेतकरी संघटनांच्या कचखावू वृत्तीवर टीकेची झोड उठविली. खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या भूमिकांविषयी नाराजी व्यक्त केली. स्वत:ची पदे टिकविण्यासाठी काही जण एमआयएमसारख्या पक्षांशी हातमिळविणी करीत आहेत. तर काही जण मंत्रिपदे घेऊन सरकारचे गोडवे गात आहेत. अशा भूमिकांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे डॉ. नवले यांनी या वेळी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...
पर्यावरणकेंद्री विकास ही जगाची गरच आजमितीला भारत व जगाला भेडसावणारी अव्वल समस्या आहे...
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...