agriculture news in marathi, Ajit Nawale warns government on milk rate issue in state | Agrowon

आता दूध दरासाठी शेतकऱ्यांचा लाँगमार्च
टीम अॅग्रोवन
रविवार, 6 मे 2018

पुणे : दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव देण्यास सरकार अपयशी ठरल्यास दूध उत्पादक शेतकरी काही दिवसांनंतर मंबईच्या दिशेने विराट लाॅंगमार्च करून मंत्रालयासमोर फुकट दूध वाटतील. त्यातून तयार होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीला शेतकरी नव्हे तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. 

पुणे : दुधाला प्रतिलिटर २७ रुपये भाव देण्यास सरकार अपयशी ठरल्यास दूध उत्पादक शेतकरी काही दिवसांनंतर मंबईच्या दिशेने विराट लाॅंगमार्च करून मंत्रालयासमोर फुकट दूध वाटतील. त्यातून तयार होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीला शेतकरी नव्हे तर सरकार जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. 

समितीचे प्रमुख व राज्य किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी पुण्यात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. “शहरात ४२ रुपये दराने विकले जाणारे गायीचे दूध शेतकऱ्यांकडून १७ रुपयांनी विकत घेतले जाते आहे. गेल्या दहा महिन्यांपासून सरकारने आदेश देऊनदेखील २७ रुपये भाव दूध संघाकडून शेतकऱ्यांना दिला जात नाही. सरकार बेशरम झाल्यामुळेच आम्ही लाखगंगामधून फुकट दूध वाटा आंदोलनाला सुरवात केली आहे. त्यामुळे दहा दिवसांत सरकारने मागण्या मान्य न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलन अटळ राहील," असे डॉ. नवले म्हणाले. 

राज्यातील शेतकऱ्यांकडून सव्वा कोटी लिटर्स दुधाचे संकलन केले जाते. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार एका लिटरसाठी शेतकऱ्याला ३५ रुपये खर्च येतो. साडेतीन फॅटचे दूध शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्याचे भेसळीने सव्वा दोन कोटी लिटर दूध तयार केले जात आहे. यात प्रक्रियाचालक, मार्केटिंगवाले तसेच भेसळ माफियांकडून मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. हेच भेसळीचे दीड फॅटचे दूध शहरी ग्राहकांना ४२ रुपयांना दिले जात आहे. ग्राहक आणि शेतकरी अशा दोन्ही वर्गाची लूट चालू असताना सरकार बेशरमपणे गप्प बसले आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर हेच जबाबदार असतील, असा इशारा डॉ. नवले यांनी दिला. 

शेतकरी नेते धनंजय धोर्डे म्हणाले की, "गेल्या काही वर्षांपासून दरच मिळत नसल्याने आमच्या मनात चीड असून त्यातून फुकट दूध वाटपाचे आंदोलन सुरू झाले आहे. मात्र, आमचा अंत पाहू नका."  सध्या सुरू असलेल्या फुकट दूध वाटप आंदोलनात सरकारी कार्यालये, भाजपच्या आमदार, खासदारांना फुकट दूध वाटले जाईल. रास्ता रोको केला जाईल. त्यानंतर नगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, परभणी, बीड भागात दौरा करून दूध उत्पादकांशी संपर्क साधला जाणार आहे. त्यानंतर मंत्रालयाकडे लाॅंगमार्च केला जाईल, असे समितीने घोषित केले आहे. 

सहकारी दूध संघाला नोटिसा देऊन २७ रुपये भाव देण्याचे सांगितले, पण संघांनी या नोटिसा फेकून दिल्या आहेत. खासगी उद्योगाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असून परराज्यातील दूध तात्काळ बंद केले पाहिजे, अशी मागणीही संघर्ष समितीने केली. यावेळी शेतकरी नेते धनंजय धोर्डे, विठ्ठल पवार, अनिल देठे, साईनाथ घोरपडे, संतोष वाडेकर, दिगंबर तुरकणे, राजेंद्र तुरकणे, किरण वाबळे, नाथा शिंगाडे उपस्थित होते. 

इतर अॅग्रो विशेष
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...