तेलंगणात मोफत वीज; इकडे जोडणीही नाही: अजित पवार

तेलंगणात मोफत वीज; इकडे जोडणीही नाही: अजित पवार
तेलंगणात मोफत वीज; इकडे जोडणीही नाही: अजित पवार

सातारा : ऊर्जामंत्री असताना मी एकाही शेतकऱ्याची वीज जोडणी थकविली नाही. परंतु; हे सरकार पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये एकही विज जोडणी दिली नाही. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज जाहिर केली आणि महाराष्ट्रात वीज जोडण्याही मिळत नाही, अशी खंत माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्‍त केली.  महाराष्ट्र राज्य बॉक्‍सिंग स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास ते आले असता ते येथील शासकीय विश्रामगृहात थांबले. त्यांनी विविध विषयांवर माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सत्यजीत पाटणकर, मुंबई बाजार समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, माजी सभापती सतिश चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""आपल्या सरकारमध्ये माझ्याकडे ऊर्जा खाते असताना मागेल त्याला वीज जोडणी देण्यात आली. मात्र, आपले सरकार गेल्यापासून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारामध्ये एकही विज जोडणी दिली नाही. नागपूरच्या अधिवेशनात त्यावर प्रश्‍न उपस्थित केला असता ऊर्जामंत्र्यांनी "तिकडे इतकी कामे झाले आहे की, त्यांना कामे देऊन तुमच्याबरोबर आणल्याशिवाय इकडे वीज जोडण्या देता येणार नाहीत,' असे सांगितले. मी त्यांना म्हणालो की, शेतकऱ्याने विहिर, कुपनलिका घेतली आणि त्याला पाणी लागले तर वीज दिली पाहिजे. तिकडे दहा हजार जोडण्या देणार असला तर किमान हिकडे दोन हजार जोडण्यात तरी दिल्या पाहिजे.'' 

आमदार शशिकांत शिंदे यांनी "आम्ही मोर्चा काढल्यानंतर पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी जोडण्या द्यायला सांगितले,' असे सांगितले. ते वाक्‍य खंडित करत श्री. पवार म्हणाले, ""नुसते बोलून काही होणार नाही. पैसे आल्याशिवाय कामे होणार नाहीत.'' त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी बिले वसूल केल्याशिवाय दुरुस्ती होत नाहीत. दुरुस्तीला पैसेही दिले जात नाहीत, असे नमूद केले. त्यावर श्री. पवार यांनी "दहा शेतकऱ्यांपैकी पाच जणांचे पैसे थकले असले तरी ट्रान्सफॉर्मर दुरुस्त केले जात नाहीत,' अशी खंतही सरकारच्या धोरणांबद्दल व्यक्‍त केली. 

"डीपीसी'बाबत विचारपसून  जिल्ह्याच्या प्रश्‍नांवर दक्ष असलेल्या श्री. पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत काय झाले हे, हे आवर्जुन विचारले. तेव्हा संजीवराजेंनी शशिकांत शिंदे, डॉ. दिलीप येळगावकर यांच्यात वांदग झाल्याचे सांगितले. श्री. शिंदेंनी डॉ. येळगाकर जिल्ह्याचे सोडून राज्याचे बोलत असल्याचे सांगितले. त्यावर श्री. पवार यांनी "डीपीसी' जिल्ह्याची आहे तर जिल्ह्यावरच बोलायचे,' असा टोमणा मारला. त्यापूर्वी फलटणच्या गळीत हंगामाची चौकशीही त्यांनी केले. तसेच विश्रामगृहातील झाडे वाळली असल्याने नाराजीही दर्शविली. 

दादांचे "सज्जन'दर्शन  अजितदादा विश्रामगृहावर असल्याने सज्जनगडावरील बाळासाहेब स्वामी हे "तुम्ही गडावर आला नाही,' असे अजितदादांना म्हणाले. तेव्हा दादांनी पुन्हा नक्‍की येतो, असे सांगत पाणीपुरवठा योजना कशी सुरू आहे, पर्यटक स्वच्छता राखतात का, अशी चौकशीही केली. संबंधित व्यक्‍तीने प्रसादाचे लाडू आणि खडीसाखरचे पुडे देण्यास पुढे केले असताना दादांनी बूट काढून उभे राहून ते स्विकारले. त्यानंतर ते लाडू दादांच्या "पीए'ने तात्काळ गाडीत नेऊन ठेवले. तेव्हा ते लाडू मागवत पुन्हा उपस्थितांना वाटण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

...तर मी सनकावली असती!  अजित पवारांची चाणाक्ष नजर आजही कार्यकर्त्यांनी पाहिली. उपस्थितांशी बोलत असतानाही भिंतीवरील डिसेंबर 2017 ची दिनदर्शिका पाहिले. त्यावेळी त्यांनी शिपायाला बोलावून ते बदलायला सांगितले. "मी सरकारमध्ये असतो तर सनकावली असती,' असे दादास्टाइल व्यक्‍तव्यही त्यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादीतील महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांनी प्रकाशित केलेली दिनदर्शिका तेथे लावू लागले. त्यावेळी श्री. पवार यांनी हस्तक्षेप करत ते पक्षाचे आहे, सरकारी कार्यालयात लावू नका, असे सांगून हजरजबाबीपणाही दाखविला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com