agriculture news in marathi, Ajit pawar criticizes state government | Agrowon

विश्वासघाताची किंमत मोजावी लागेल ः पवार
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 फेब्रुवारी 2018

नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा आगडोंब करणारे हे विश्वासघातकी, खोटारडे सरकार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी या सरकारने शेतकरी संपवण्याचाच चंग बांधला आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या वाटोळ्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. पैसे बुडवणाऱ्यांना पाठबळ देणारे हे सरकार गरिबांना आणखी गरीब करीत असल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

नगर : फेकूगिरी, दिशाभूल, फसव्या घोषणा, महागाईचा आगडोंब करणारे हे विश्वासघातकी, खोटारडे सरकार आहे. शेतकऱ्यांना आधार देण्याएवजी या सरकारने शेतकरी संपवण्याचाच चंग बांधला आहे. मात्र शेतकऱ्यांचे झालेल्या वाटोळ्याची किंमत सरकारला मोजावी लागेल. पैसे बुडवणाऱ्यांना पाठबळ देणारे हे सरकार गरिबांना आणखी गरीब करीत असल्याचा आरोप करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, राहुरी, कोपरगाव, अकोले येथे ‘हल्लाबोल’ यात्रेनिमित्त सभा झाल्या. अजित पवार यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्राम कोते यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळ्या सभांतून सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. राहुरीच्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, की पायाभूत सुविधांवर खर्च केल्यास राज्यावर आठ लाख कोटींचा कर्जाचा डोंगर वाढेल. मुख्यमंत्र्यांनी मराठा, धनगर, मुस्लिम समाजाला आरक्षणाबाबत झुलवत ठेवले. मूळ आरक्षणाला धक्का न लावता, आर्थिक निकषावर गरिबांना आरक्षण द्यावे, असे आमचे मत आहे. 

‘‘साखर कारखान्यांची वीज सरकार खरेदी करीत नाही. चुकीच्या धोरणांमुळे साखर उद्योग अडचणीत आला. शिवसेना शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखविते. विजय मल्ल्या, नीरव मोदी बॅंका बुडवून देशाबाहेर पळाले. त्यांचे काहीच वाकडे करत नसलेले सरकार शेतकऱ्यांना मात्र वेठीस धरत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना ऐतिहासिक, सरसकट, नंतर तत्त्वतः असे शब्द फिरविले. आता गारपिटीची मदत देतानाही कंजुषी केली जात आहे. सरकारची शेतकऱ्यांबाबतची भूमिकाच संशयास्पद आहे. सरकारने शेतकऱ्यांना संपण्यासाठी प्रयत्न केले तर त्याची किंमत मोजावी लागेल,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

इतर अॅग्रो विशेष
लातूरच्या अडत बाजारात २१४७ कोटींची...लातूर : जिल्ह्यात सतत दोन वर्ष पडलेला पाऊस,...
जळगावात बुधवारी जमीन सुपीकतेविषयी...जळगाव  ः शेतीचे ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारातील...
विकास यात्रेत प्रत्येक भारतीयाचे योगदान...नवी दिल्ली ः चार वर्षांपूर्वी भारतात बदल...
मॉन्सून आज अरबी समुद्रातपुणे ः मॉन्सून शुक्रवारी (ता. २५) अंदमानात दाखल...
विदर्भात उष्णतेची लाट; चंद्रपूर ४६.३...पुणे ः विदर्भात उष्णतेची लाट टिकून राहण्याबरोबरच...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवणार...पुणे ः तीन वर्षांचा कृषी तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम...
‘अॅग्रोस्को’मध्ये १५६ शिफारशींना मंजुरीदापोली, जि. रत्नागिरी : राज्यातील चारही कृषी...
कृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा...सातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे...
‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची...औरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही...
मोदी सरकार पास की नापास? बघा रिपोर्ट...मोदी सरकारचा चार वर्षांचा प्रवास, पुढच्या...
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...