agriculture news in marathi, Ajit pawar critisies govt regarding farmers agitation | Agrowon

शेतकऱ्याने नाही पिकवले; तर सरकार लोकांना पिझ्झा देणार काय? : अजित पवार
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

"कानगाव (ता. दौंड) येथील शेतकरी आक्रोश आंदोलनाला दहा दिवस उलटले, तरी सरकारला घाम आला नाही. भगवे कपडे घालणारा मुख्यमंत्री  त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करतो, मग जाकीटवाला मुख्यमंत्री का करू शकत नाही?'' 

वरवंड, जि. पुणे  : "सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने नाही पिकवले; तर सरकार लोकांना काय पिझ्झा खायला घालणार काय?'' असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

कानगाव (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी दोन नोव्हेंबरपासून पुकारलेल्या राज्यव्यापी शेतकरी आक्रोश आंदोलनास अजित पवार यांनी शनिवारीदुपारी दोन वाजता अचानक भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.

या वेळी त्यांनी आंदोलनातील मागण्यांबाबत शेतकरी आक्रोश समितीचे माउली शेळके, भानुदास शिंदे, सयाजी मोरे यांच्याशी चर्चा केली.

 "आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत. आंदोलन करणे त्यांचा अधिकार आहे. सरकारने सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पुढे तर आले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, अजित बलदोटा, सत्वशील शितोळे, महेश भागवत, नितीन दोरगे, विकास खळदकर, नाना फडके आदी उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ""सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे साखरेचे बाजार कमी होत चालले आहे. साखरेला 45 रुपये प्रतिकिलो दर मिळाला, तर उसाला अपेक्षित दर मिळू शकतो. कारखान्यामधील उसाच्या मॉलेसीसला प्रचंड टॅक्‍स लावला. याचा अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना फटका बसत आहे."

"आमच्या काळात विजेच्या अडचणी मोठ्या प्रमाणात सोडविण्यात आल्या. नोटाबंदी व "जीएसटी'मुळे सर्वांनाच मोठा फटका सहन करावा लागत आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासारखा शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता सरकारमध्ये नाही.'' 

दौंड तालुक्‍याच्या राजकारणाबाबत अजित पवार म्हणाले, ""आम्ही सत्तेत असताना जनतेची कामे केली. मात्र, जनतेने आम्हालाच बाजूला काढले अन्‌ ज्यांनी कारखाना बंद पाडला, त्यांच्याच मागे उभे राहिले. हे वागणं बरं नाही.'' 

इतर ताज्या घडामोडी
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...