agriculture news in marathi, ajit pawar demand for give a ten percent authority to zp for transfers of teachers, pune, maharashtra | Agrowon

जिल्हा परिषदेला १० टक्के बदल्यांचे अधिकार द्यावेत : अजित पवार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

पुणे   : पारदर्शकतेच्या नावाखाली कामे ‘ऑनलाइन’ पद्धतीने करायची असतील, तर सर्वच कामे संगणकाला द्या. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांची गरजच काय, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. शिक्षकांच्या १०० टक्के ऑनलाइन बदली धोरणाला विरोध करताना, विशेष बाब म्हणून १० टक्के बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेकडे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पुणे   : पारदर्शकतेच्या नावाखाली कामे ‘ऑनलाइन’ पद्धतीने करायची असतील, तर सर्वच कामे संगणकाला द्या. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांची गरजच काय, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. शिक्षकांच्या १०० टक्के ऑनलाइन बदली धोरणाला विरोध करताना, विशेष बाब म्हणून १० टक्के बदल्यांचे अधिकार जिल्हा परिषदेकडे द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.

पुणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण बुधवारी (ता.५) श्री. पवार यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, आरोग्य व बांधकाम समितीचे सभापती प्रवीण माने, महिला बालकल्याण समिती सभापती राणी शेळके, समाजकल्याण समिती सभापती सुरेखा चौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य या वेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, की शिक्षक बदल्यांची कामे आॅनलाइन पद्धतीने करण्याचे धोरण राज्य सरकारने घेतले. यामुळे अनेक शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली कोणावर अन्याय होता कामा नये. काही विशेष प्रकरणांमध्ये १० टक्के बदलीचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना द्यावेत. राज्यात शिक्षकांच्या जागा रिक्त अाहेत. समायोजनही होत नाही. त्यामुळे मुलांचे नुकसान होत असून, रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. जीआर काढून नंतर ते रद्द केले जातात, परीक्षा वेळेवर होत नाहीत, पेपर तपासले जात नाहीत. ही बाब शिक्षण क्षेत्राला मारक आहे.

या वेळी अामदार राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या वक्तव्याचा श्री. पवार यांनी निषेध केला. यावेळी अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी प्रास्ताविक केले.

इतर ताज्या घडामोडी
खोटी आकडेवारी दाखवून गाळप परवाने घेतले...पुणे   : शेतकऱ्यांना `एफआरपी` दिल्याचे...
वाशीम जिल्ह्यात रब्बीची २४ टक्के पेरणीवाशीम   ः जिल्हा प्रशासनाला रब्बी हंगामातील...
नगरमध्ये गहू, हरभरा पिकांचे १५ हजार...नगर   ः जिल्ह्यात कृषी विभागाच्या विविध...
पुणे जिल्ह्यात पंधरा दिवसांत पाणीसाठा...पुणे : दुष्काळाच्या झळा वाढत असतानाच पुणे...
केळीच्या खेडा खरेदीबाबत भरारी पथकांची...जळगाव  ः खानदेशात केळीच्या खेडा खरेदीसंबंधी...
बोंड अळीच्या नुकसानीचे अनुदान...अकोला : अाधीच अनेक दिवसांपासून रखडलेले बोंड अळी...
नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे...नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना...
जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांना...सांगली  : जत तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या...
आंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...
फळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...
योग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...
धनगर समाजाचा उद्या औरंगाबादमध्ये धडक...औरंगाबाद : धनगर समाजाला एस.टी.(अनुसूचित जमाती)...
जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी माधवराव...मनमाड, जि. नाशिक : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक,...
केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री अनंत...बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण...
ऊस दरप्रश्नी सोलापुरात ‘स्वाभिमानी’...सोलापूर  ः गेल्या गळीत हंगामातील उसाची...
दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला...अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच...
ऊस दरासाठी सातारा जिल्ह्यात रास्ता रोकोसातारा  ः जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने...
थकीत एफआरपीच्या मागणीसाठी शिरोळ येथे...कोल्हापूर  : साखर कारखान्यांनी गेल्या...
ऊस दरप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे त्रिधारा...परभणी : मराठवाड्यातील साखर कारखान्यांनी यंदाचे ऊस...
सांगलीत एकरकमी ‘एफआरपी’कडेगाव, जि सांगली  ः कोल्हापूर जिल्ह्याने...