agriculture news in marathi, Ajit Pawar questions state government on Milk issue | Agrowon

सरकारचं डोकं फिरलंय का ? : अजित पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नागपूर : सध्या दूध दरावरून राज्य सरकार आणि सहकारी दूध संघ यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) राज्य सरकारचं डोकं फिरलंय का, असा सवाल करत हल्लाबोल केला. विधानसभेत तारांकित प्रश्नावरील चर्चेवेळी ते बोलत होते. 

नागपूर : सध्या दूध दरावरून राज्य सरकार आणि सहकारी दूध संघ यांच्यात सुरू असलेल्या संघर्षावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) राज्य सरकारचं डोकं फिरलंय का, असा सवाल करत हल्लाबोल केला. विधानसभेत तारांकित प्रश्नावरील चर्चेवेळी ते बोलत होते. 

राज्य सरकारने जून महिन्यात गायी आणि म्हैशीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सोलापूर जिल्हा दूध संघाने कागदोपत्री दूध दरवाढ करून निपटारा शुल्कापोटी प्रतिलिटर ३ रुपये कपात करून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. या संदर्भात सरकारने काय कारवाई केली आहे, अशी विचारणा आमदार भारत भालके यांनी केली होती. 

त्यावर पदूममंत्री महादेव जानकर यांनी याची कबुली देत या प्रकरणात संघाला सहकारी संस्था अधिनियम कलम ६८ अन्वये नोटीस बजावल्याचे स्पष्ट केले. तसेच त्यानंतर संघाने दर कमी केल्यामुळे आलेल्या फरकाची ६ लाख ५६ हजार ९१८ रुपये इतकी रक्कम दूध उत्पादकांना दिल्याचे स्पष्ट केले. याशिवाय निपटारा शुल्कापोटी कपात केलेली १० लाख ७४ हजार ४०७ रुपये रक्कमही शेतकऱ्यांना दिल्याचे सांगितले. 

दरम्यान, अजित पवार यांनी सरकारचं डोकं फिरलंय का? असा सवाल करीत दूध उद्योगाची अडचण समजून घेत उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. दूध भुकटीचे दर कोसळल्याने संघ संकटात आले आहेत. अशात दुधाचा दर २७ रुपये केल्यामुळे संघ अडचणीत आले आहेत, दूध संघ संपले तर दूध उत्पादक शेतकरीसुद्धा अडचणीत येतील. दूध संघ तयार करत असलेली दुधाची पावडर परदेशात पाठवा म्हणजे दुधाची बाजारपेठ सुधारेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

इतर ताज्या घडामोडी
कष्टाचे पैसे ना बे?... बुडवणा-यांचं...येवला, जि. नाशिक : तुमचे कष्टाचे पैसे ना बे...
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो...कऱ्हाड, जि. सातारा  ः रखरखत्या उन्हात राबून...
कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील...पुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या...
पाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख...औरंगाबाद  : मराठवाड्यासह खानदेशातील पाच...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
ग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९...अकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर...
यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा...वडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी...
सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खतांच्या...पारंपरिक शेतीच्या तुलनेमध्ये नव्या संकरीत जाती...
सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा... सातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण...
पुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख...पुणे  ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी...
हिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात... हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी... नाशिक  : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार...
अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’ नगर  ः ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं...
जळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे... जळगाव  ः मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत...
फळपीक सल्ला : लिंबूवर्गीय फळ, केळी लिंबूवर्गीय फळ पीके मृग बहराची फळे काढणी...
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश...नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम...
सीताफळ पीक सल्लासीताफळ हे पीक पावसावर घेतले जाते. मात्र,...
नेदरलॅंड फळ बाजारात ब्राझीलचे वर्चस्वगेल्या काही वर्षांमध्ये आंबा, लिंबू आणि...
चालण्याचा व्यायाम आरोग्यासाठी फायद्याचाआरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता कोणीही नाकारत...
पूर्वहंगामी कापूस लागवडीला बसणार फटका जळगाव  ः गुलाबी बोंड अळीचा धसका आणि...