agriculture news in Marathi, Ajit Pawar says chief minister shuts schools, Maharashtra | Agrowon

मुख्यमंत्री शाळा बंद करताहेत : अजित पवार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

बीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे विकासदर घटला. तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळा बंद करून सामान्यांच्या मुलांचे शिक्षण बंद करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील नेते अजित पवार यांनी केला. 

बीड : सरकार मस्तीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊले ठेवून मुख्यमंत्री काम करत आहेत. मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे विकासदर घटला. तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळा बंद करून सामान्यांच्या मुलांचे शिक्षण बंद करत असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातील नेते अजित पवार यांनी केला. 

हल्लाबोल यात्रेत बुधवारी (ता. १७) जिल्ह्यात पाटोदा व बीड येथे सभा झाल्या. तिसरी सभा गुरुवारी (ता. १८) गेवराई येथे झाली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, आमदार अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, विद्या चव्हाण, विक्रम काळे, महिला आघाडीच्या चित्रा वाघ, युवक आघाडीचे संग्राम कोते पाटील उपस्थित होते. 

श्री. पवार म्हणाले, की या शासनाच्या निर्णयांची लोकांना ऊब आली आहे. या सरकारला सामान्य, शेतकरी, व्यापाऱ्यांबद्दल प्रेम, आपुलकी, जिव्हाळा राहिलेला नाही. शेतीमालाला भाव नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने नदी, तलाव, कॅनाल, बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणी आहे; पण वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. परिणामी रब्बी हंगाम हातचा जाण्याची वेळ आली आहे. जरा सबुरीने घ्या, रब्बीपर्यंत वीज द्या, असे आवाहन त्यांनी आपल्या खास शैलीत सरकाला दिले. या सरकारच्या निर्णयाची किव करावी वाटते.

दिवंगत नेते यशवंतराव चव्हाणांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांना बेरजेचे राजकारण शिकवले. तेच राजकारण आपण पुढे नेत आहोत. पुढच्या काळात ज्येष्ठांचा अनुभव आणि नव्यांना सोबत घेऊन राजकारण करायचे आहे. सरकार मस्तीत असून, त्यांची मस्ती उतरविण्यासाठी आगामी निवडणुकांत निट बटने दाबा. अमरसिंह पंडित यांनी मोठ्या प्रयत्नाने जयभवानी सहकारी साखर कारखाना सुरू केला. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा भेटला आहे. 

या वेळी धनंजय मुंडे, सुनील तटकरे, आमदार अमरसिंह पंडित, नवाब मलिक, जयसिंह सोळंके, महेबूब शेख यांचीही भाषणे झाली. या वेळी संग्राम कोते पाटील, संदीप क्षीरसागर, सुरेखा ठाकरे, सोनल देशमुख, राजेंद्र जगताप, बजरंग सोनवणे, रेखा फड उपस्थित होते. प्रास्ताविक संयोजक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले. तत्पूर्वी अजित पवारांच्या स्वागतार्थ विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली युवकांची मोठी दुचाकी फेरी निघाली. सभेला मोठी गर्दी होती. 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...